आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे \'नटरंग\', \'बीपी\', \'बालगंधर्व\'चा दिग्दर्शक रवी जाधवचे ऑफिस, बघा INSIDE PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरात क्षेत्रातल्या प्रदीर्घ अनुभवानंतर मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत प्रसिध्दीस आलेले नाव म्हणजे, रवी जाधव. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी जाहिरात क्षेत्र गाजवलंच आणि चित्रपट दिग्दर्शन माध्यमातही यशस्वी वावर केला. आता रवी यांनी अभिनेता म्हणून करिअरची नवी इनिंग सुरु केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटात रवी यांनी अभिनय साकारला असून त्यांचा हा चित्रपट आज (11 ऑगस्ट) रिलीज होतो. समीक्षकांनी रवी जाधव यांच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. आता सिनेरसिक रवी जाधव यांच्या अभिनयाला आणि चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार, हे लवकरच कळेल.  
 
पाच राष्ट्रीय पुरस्कार केले आहेत नावी... 
‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, 'बीपी', 'टाइमपास', 'टाइमपास 2'सारख्या कलात्मक दर्जेदार सिनेमांच्या त्यांनी केलेल्या दिग्दर्शनाला मराठीसोबत अमराठी प्रेक्षकांनीही मनमुराद दाद दिली. नेहमीच वेगळा विचार घेऊन दर्जेदार कलाकृती साकारणारे लेखक-दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'मित्रा' या लघुपटाला 62 व्या राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार घोषित झाला. एकुण पाच राष्ट्रीय पुरस्कार रवी जाधव यांच्या नावावर आहेत. 'बँजो' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्येही त्यांची एन्ट्री झाली.   
 
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म... 
गिरणी कामगाराच्या घरी जन्मलेला हा तरुण आपल्या कर्तृत्वाने जाहिरात क्षेत्रानंतर आता मराठी सिनेसृष्टीसुद्धा गाजवत आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये रवी यांनी स्वतःचे नवीन ऑफिस घेतले. पत्नी मेघनाच्या पाठिंब्याने हे शक्य झाल्याचे रवी सांगतात.  रवी जाधव यांनी त्यांच्या या नवीन ऑफिसची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आपला एक अनुभवसुद्धा चाहत्यांना सांगितला होता. रवी जाधव म्हणाले, ''ऑगस्ट 2008 मध्ये अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचे ऑफिस सोडले, त्यावेळी घरच्यांना खूप टेंशन आले होते. केवळ मी आणि मेघना आमच्या निर्णयावर ठाम होतो. नोव्हेंबर 2014 ला मी आणि मेघना आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये शिफ्ट झालो. खरंच हा अल्बम तयार करायला खूप श्रम लागले व वेळ लागला.''
 
असे आकारास आले 'अथांश...' हे नाव...
'अथांश कम्युनिकेशन्स अँड रवी जाधव फिल्म्स' या आपल्या प्रॉडक्शनच्या हाऊसच्या नवीन ऑफिसला त्यांनी 'इट्स प्युअल अँड सिंपल' असे म्हटले आहे. इतकेच नाही तर 'अथांश कम्युनिकेशन्स' या नावामागचा इतिहासही त्यांनी सांगितला. रवी जाधव म्हणाले, ''29 डिसेंबर 2006 ला नागाव, अलिबाग येथे माझ्या फार्म हाऊसला गेलो होतो. माझी मुले 'अथर्व' आणि 'अंश' बीचवर खेळत होते. सहज म्हणून दोघांचे नाव एकत्र करून वाळूत 'अथांश' असे लिहिले. तेव्हा माहित नव्हते की पुढे जाऊन 'अथांश कम्युनिकेशन्स' ही आमची कंपनी नटरंग, बालक पालक, टाइमपास, मित्रा व टाइमपास 2 या सिनेमांची निर्मिती करणार आहे...''

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शुन्यातून विश्व निर्माण करणा-या रवी जाधव यांच्या अथांश कम्युनिकेशन्सच्या नवीन ऑफिसची खास झलक दाखवत आहोत. रवी आणि त्यांच्या पत्नी मेघना यांनी अतिशय सुंदररित्या ते सजवले आहे.
 
(सर्व फोटो साभारः दिग्दर्शक रवी जाधव यांचे फेसबुक अकाऊंट)
बातम्या आणखी आहेत...