आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Life Parter: \'सोबत खंबीर असली की अडचणींचे डोंगर लिलया पार होतात\', म्हणताहेत मराठी कपल्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नीचे नाते हे सर्वस्वी विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असते. संसारात अनेकवेळा कसोटीचे क्षण येत असतात. पण या वाटेवर चालताना दोघांची एकमेकांना खंबीर साथ असेल, तर मग अडचणींचे कितीही मोठे डोंगर उभे असले, तरी ते लिलया पार होऊ शकतात. असाच एक संदेश देण्यात आला आहे, प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटात. गतिमंद मुलाचा सांभाळ करताना मोहन काटदरे आणि त्यांची पत्नी शैला काटदरे यांनी एकमेकांना दिलेली खंबीर साथ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय.
 
सध्या या चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन सुरु आहे. प्रमोशनचाच एक भाग म्हणून मराठी कलाकारांनी त्यांच्या जोडीदारासोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करुन चित्रपटासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी हिने अभिनेता प्रसाद लिमयेसोबतचे दोन फोटोज शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, 'सोबत खंबीर असली की अडचणींचे डोंगर लिलया पार होतात'... जुई आणि प्रसाद गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रसादने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, पुढचं पाऊल या मालिकांमध्ये काम केले आहे. 
 
जुई आणि प्रसादसोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या ख-या आयुष्यातील जोडीदारासोबतचे फोटोज शेअर करुन कच्चा लिंबू या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हातभार लावला आहे. पाहुयात, सेलिब्रिटी कपल्सचे सोशल मीडियावर शेअर झालेले खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...