आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गौरी\'चे हे रुप नक्कीच यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल!! घायाळ करणारे आहे हे न्यू PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘काहे दिया परदेस’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत नेहमी साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी अर्थातच अभिनेत्री सायली संजीव मालिकेनंतर आता कुठे बिझी असणार हे नक्कीच जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक असतील. तर सध्या गौरी म्हणजेच सायली मोठ्या पडद्यावर झळकण्याची तयारी करत आहे. लवकरच ती अभिनेता शशांक केतकरसोबत 'भगवतगीता' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासोबतच गौरी फोटोशूट्समध्येही बिझी आहे.
 
अलीकडेच सायली संजीवने हटके फोटोशूट केलं आहे. यात तिचा बोल्ड लूक वेधून घेत आहे. नेहमी साडी आणि पारंपरिक वेशात दिसणारी सायली या फोटोमधून आपल्याला मॉडर्न वेशात दिसत आहे. तिच्या मोहक अदांमुळे हे फोटो अजूनच खुलून दिसत आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर विनायक कुलकर्णी यांनी सायलीचा बोल्ड अंदाज आपल्या कॅमे-यात कैद केला आहे. या फोटोशूटमधील चार फोटोज सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 
 
फोटोज शेअर करुन सायलीने त्यासोबत #photoshoot #fashion #glamour #attitude #makeover #different  हे हॅशटॅगही जोडले आहेत. 
 
पाहुयात, सायलीच्या नवीन फोटोशूटची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...