आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: शिव-गौरी पोहोचले स्वित्झर्लंडमध्ये, \'परदेस\'मध्ये फुलणार रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः उत्तर भारतीय शिव आणि महाराष्ट्राची लेक गौरी यांच्या प्रेमकथेला म्हणजेच झी मराठीवरील काहे दिया परदेस मालिकेला रसिकांनी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतले. या मालिकेचा नायक शिव आणि नायिका गौरी हे तर तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले. आंतरप्रांतिय जोडीच्या या प्रेमकथेला रसिकांनी नेहमीच दादच दिली. कारण दोन संस्कृतीचा, दोन परंपरांचा उत्कृष्ट मिलाफ या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता आला. मग ते शिवचे मुंबईत येऊन राहणे असो, दोघांचे प्रेमात पडणे असो, दोघांच्या घरुन लग्नाला संमती मिळवण्यासाठीची कसोटी असो किंवा मुंबईच्या गौरीने बनारसच्या सासरच्यांना प्रेमाने जिंकणे असो.. सगळ्या टप्पयांवर शिव गौरी यशस्वी ठरले.
 
अखेर दोघांचं लग्न तर झालं पण प्रेमकथेच्या या वेगवेगळ्या संघर्षमय वाटेवर वाटचाल करत असताना शिव गौरी हळूवार प्रेमाच्या क्षणांपासून दुरावले होते. दोघं हनिमूनला कुठे जाणार त्यांना घरच्या या अनेक अडचणींमधून बाजूला होऊन हनिमूनला जाता येईल की नाही याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते.
 
आता हे हळूवार क्षण शिव गौरीच्या आयुष्यात आलेयत... दोघांची प्रेमकथा आता बहरणार आहे, पृथ्वीतलावरचा स्वर्ग समजल्या जाणा-या स्वित्झर्लंडमध्ये. येत्या सोमवारपासून स्वित्झर्लंडच्या नयनरम्य निसर्गात शिव आणि गौरीचे प्रेमाचे हळूवार क्षण फुलणार आहेत. झ्युरिक, माऊंट टिटलीज, एंगलबर्ग, य़ुंफ्रा, ल्युसन अशा एकाहून एक सरस लोकेशन्स चित्रपटात रसिकांनी पाहिली होती. ते अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि त्याच्या साक्षीने रंगणारी शिव गौरीची प्रेमकथा आता झी मराठीवर काहे दिया परदेस मालिकेत येत्या ९ जानेवारीपासून रात्री ९ वा. प्रेक्षकांना पहायला मिळेल.
 
पुढे वाचा, का करण्यात आली स्वित्झर्लंडची निवड.... 
बातम्या आणखी आहेत...