आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील कैलास वाघमारे जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर बनला अभिनेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे. अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.
जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्माला आलेल्या कैलासने कॉलेजमध्ये असताना अनेक पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य यामध्ये सहभाग घेऊन अभिनेता बनण्याचे स्वप्न हे उराशी बाळगले होते. एम. ए मराठी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई येथे नाट्यशास्त्राचे दोन वर्षाचे शिक्षण हे त्याने श्री. वामन केंद्रे यांच्याकडून घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही लहान-लहान नाटकातून भूमिका साकारण्यास त्याने सुरुवात केली. याच दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी त्याची भेट झाली आणि सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी सुरु असलेल्या "माझी शाळा" या मालिकेत त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर संदेश भंडारे यांच्या "महादू" या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. संभाजी भगत यांच्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकामुळे कैलासला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख मिळाली.
आपल्या करिअरसाठी जिद्दी असलेल्या कैलास वाघमारेविषयी जाणून घेण्यासाठू पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...