आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मराठी \'कलावंतां\'नी ढोल-ताशांच्या गजरात दिला बाप्पाला निरोप, असा होता खास अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 5 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शीला देशभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी मोठमोठ्या मिरवणुका, ढोल ताशांचे पथक बघायला मिळाले. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट अनुभवायला मिळाला. विशेषतः पुण्यात मराठी कलाकारांनी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. आस्ताद काळे, स्वप्नाली पाटील, सौरभ गोखले, अनुजा साठेसह अनेक कलाकारांनी ढोल-ताशांचा गजर केला.  या कलाकारांनी 2014 साली एकत्र येऊन कलावंत ढोल ताशा पथक सुरु केले. यंदाचे हे त्यांचे चौथे वर्ष होते. 

अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत. या सर्व कलाकारांनी मिरवणुकींमध्ये बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर केला. पुण्याचे प्रसिद्ध फोटोग्राफर पुष्कराज मांढरे यांनी त्यांच्या कॅमे-यात या मराठी कलावंतांची खास झलक कैद केली आहे. 

श्रुती मराठे होऊ शकली नाही सहभागी... 
या पथकात अभिनेत्री श्रुती मराठेचाही सहभाग असतो. पण यावर्षी ती शूटिंगच्या निमित्ताने पथकात सहभागी होऊ शकली नव्हती. याविषयी तिने फेसबुकवर लिहिले होते. "आज विसर्जनाच्या दिवशी मी पुणअयात नाहीये तर चुकल्या सारखं वाटतंय. पण कलावंत ढोल ताशा पथक तयार आहे कडक वाजवायला!! #kasbaganapati #laxmiroad . Ganapati bappa morya!"

पाहुयात, यंदा कसा होता गणपती विसर्जनाला मराठी कलावंतांचा थाट खास छायाचित्रांमध्ये...

फोटो साभारः फोटोग्राफर पुष्कराज मांढरे  
 
बातम्या आणखी आहेत...