आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kandabhajji Party On Maze Pati Saubhagyavati Set

\'माझे पती सौभाग्यवती\'च्या सेटवर असा बनला कांदाभजीचा बेत, वैभव मांगले बनले शेफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'माझे पती सौभाग्यवती\'च्या सेटवर बनला कांदाभजीचा बेत - Divya Marathi
\'माझे पती सौभाग्यवती\'च्या सेटवर बनला कांदाभजीचा बेत
एन्टरटेन्मेंट डेस्कः शुक्रवारी सकाळी मुंबईत अनपेक्षित पाऊस सुरु झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ झाली. पाऊस म्हटला की वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी मिळाली की सोने पे सुहागाच. या अचानक आलेल्या पावसामुळेच झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या 'माझे पती सौभाग्यवती'च्या सेटवर कांदाभाजीचा बेत आखला गेला. मग काय मालिकेत लक्ष्मीची भूमिका वठवणारे अभिनेते वैभव मांगले यांनी पुढाकार घेत 'माझे पती सौभाग्यवती'चे किचन गाठले आणि संपूर्ण युनिटसाठी गरमागरम कांदाभजी बनवली. वैभव यांनी बनवलेल्या या कांदाभाजीवर संपूर्ण युनिट खूप खूश झाले.
या पार्टीची निवडक छायाचित्रे मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर करुन लिहिले, ''युनिटच्या चेहऱ्यावरील आनंद कशातच मोजता येवू शकत नाही. रोजच्या शूटिंगमधून हा वेळ सर्वांसाठीच खूप जरुरी आहे. आज सकाळी अचानक आलेल्या पावसामध्ये 'माझे पती सौभाग्यवती' टिमने वैभव मांगलेच्या हातच्या गरमागरम कांदाभाजींचा आनंद लुटला.''

चला तर मग याच खमंग मेजवानीचे फोटो बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...