आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा याडं लावणार \'आर्ची\', पाहा तिच्या दुस-या सिनेमाचा ट्रेलर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला. 100 कोटींचा गल्ला जमवत या सिनेमाने मराठीतील सर्व रेकॉर्ड मोडित काढले. मराठी पाठोपाठ आता कन्नड भाषेतही हा सिनेमा रिलिज केला जात आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस रिंकूचा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. 'सैराट'च्या कन्नड रिमेकमध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते साथ्या प्रकाश यांचा मुलगा निशांत मुख्य भूमिकेत आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकसात प्रदर्शित झालाय.
 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाली सिनेमातील गाणी रिलीज...
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘मनसु मल्लिगे’ या सिनेमातील सर्व गाणी ऑनलाईन रिलीज करण्यात आली आहेत. कन्नडमध्येही अजय-अतुल यांनीच गाणी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केली आहेत. मराठीत अजय-अतुल, श्रेया घोषाल, चिन्मयी यांनी गाणी गायली होती. तर कन्नडमध्येही या गायकांचा आवाज ऐकायला मिळतोय. मराठी सिनेमात एकुण चार गाणी होती, तर कन्नडमध्ये मात्र एकुण पाच गाणी असून पाचवे गाणे गायक सोनू निगमच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.
 
मार्च महिन्यात होणार सिनेमा रिलीज...
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. नारायण यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून याची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश आणि झी स्टुडिओ यांनी केली आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते.
 
 
चला तर मग पुढील स्लाईड्सपासून बघा, कन्नड सिनेमातील रिंकूचे खास फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर पाहा सिनेमाचा ट्रेलर...

 
बातम्या आणखी आहेत...