आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे हे कन्यादान मालिकेवर पडदा! 20 जुलैला अखेरचा भाग दाखवण्‍यात येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झी मराठी वाहिनीवरील वडील-मुलीच्या नात्यावर आधारित ‘असे हे कन्यादान’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे ही मालिका लवकर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० जुलै रोजी या मालिकेचा अखेरचा भाग दाखवण्यात येईल.

काैटुंबिक विषय असला तरी या मालिकेला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पाहण्यासाठी आम्ही भाग पाडू शकत नाही. त्यामुळेच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले. दरम्यान, मालिका बंद करण्याच्या निर्णयामुळे अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासह सर्व कालाकार नाराज झाले आहेत.