आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: तेजश्री-प्रशांतच्या नाटकाचे अर्धशतक पूर्ण, आजारी असूनही तेजश्री दिसली उत्साहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजश्री प्रधान आणि प्रशांत दामले चाहत्यांच्या गराड्यात
तेजश्री प्रधान आणि प्रशांत दामले स्टारर ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाने नुकतेच ५० प्रयोग पूर्ण केलेत. वसंत सबसनीस लिखीत आणि मंगेश कदम दिग्दर्शित हे नाटक बाप-लेकीच्या नात्यावर आधारीत आहे. तीनच महिन्यांपूर्वी हे नाटक रंगभूमीवर आले होते. आणि आता नाटकाने अर्धशतक पूर्ण केले आहे.
पन्नासाव्या प्रयोगानंतर ग्रीनरूममध्ये तेजश्रीच्या भोवती जमलेले चाहते पाहून ह्या नाटकाची आणि तेजश्रीच्या ‘होणार सून..’ची सुध्दा लोकप्रियता कळत होती. खरं तर पन्नासाव्या प्रयोगावेळी तेजश्री आजारी होती. पण त्याही अवस्थेत चाहत्यांसोबत फोटो काढणे आणि त्यांना ऑटोग्राफ देणे सुरूच होते.
अभिनेत्री तेजश्री प्रधानला याविषयी विचारल्यावर ती म्हणते, “ ह्या चाहत्यांमूळेच तर आम्ही इथवर पोहोचलोत. आजारी असले तरीही ‘शो मस्ट गो ऑन’ ह्या प्रथेने नाटक करणे आवश्यकच आहे. आणि चाहत्यांना नाही म्हणणे योग्य नाही. सोमवार ते शुक्रवार मी ‘होणार सून..’ मध्ये व्यस्त असते. आणि शनिवार रविवार नाटकामध्ये. त्यामुळे थोडा हवापाण्यात बदल झाला की आजारी पडायला होतं. पण ठीक आहे. चाहत्यांपासून काम जोमाने करायची उर्जा मिळते.”
आमच्याशी बोलता बोलता, तेजश्रीचे चाहत्यांशीही गप्पा मारणे सुरूच होते. उत्साही तेजश्री आपल्या नाटकाच्या अर्धशतक पूर्तीबद्दल बोलते,” ५० प्रयोग पूर्ण होतायत, म्हटल्यावर मी खूप उत्साहात होते. मला वाटलं, आता काही सेलिब्रेशन असेल. प्रशांत दादाशी बोलल्यावर मात्र दादाने सांगितलं की, अगं तेजू, ही तर सुरूवात आहे. सेलिब्रेशन हे नेहमी १००, ५०० किंवा हजार प्रयोगांनंतर होते. त्यामुळे आम्ही काही सेलिब्रेशन करत नाही. पण चाहते भेटले की, आपोआपच आनंद ओसंडून वाहत असतो. आणि सेलिब्रेशनही होत असतेच.“
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, तेजश्रीच्या ह्या कार्टी विषयी