आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री अर्चना जोगळेकरला मातृशोक, उर्मिला कानेटकरच्या होत्या गुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे मुलगी अर्चना आणि उजवीकडे उर्मिलासोबत आशा जोगळेकर - Divya Marathi
डावीकडे मुलगी अर्चना आणि उजवीकडे उर्मिलासोबत आशा जोगळेकर
प्रतिथयश कथ्थक गुरु आशा जोगळेकर यांचे आज सकाळी अंधेरी (प.) येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. गेली पन्नास वर्षे त्या अंधेरी येथे 'अर्चना नृत्यालय'च्या मार्फत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देत होत्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना अर्चना जोगळेकर ह्या त्यांच्या कन्या आहेत. तसेच आशा जोगळेकरांच्या पश्चात 1 मुलगी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर त्यांची शिष्या होती. उर्मिला आशा यांच्याकडून कथ्थक शिकली आहे. उर्मिलाने फेसबुकवर दु:ख व्यक्त केले आहे. उर्मिलाने फेसबुकवर गुरु आशा यांच्यासोबतचे काही क्षण पोस्ट करून लिहिले, 'माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती निघून गेली. मी जी व्यक्ती आहे, ती तुमच्यामुळे आहे. तुम्ही नेहमी माझ्या सोबत राहाल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आशा जोगळेकर यांचे मुलगी अर्चना आणि शिष्या उर्मिलासोबतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...