आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Katyar Kaljat Ghusali Pune Premiere

नऊवारीतील मराठमोळ्या अमृताला बघून तुम्हीही म्हणाल So Beautiful!! पाहा फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा मराठमोळा अंदाज - Divya Marathi
अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा मराठमोळा अंदाज
सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा दिवाळीची पर्वणीच ठरली. 'कट्यार काळजात घुसली' या संगीत रंगभूमीवरच्या अजरामर नाटकाचा सिनेमा बनविण्याचे आव्हान अभिनेता सुबोध भावे यांनी उत्तमरित्या पेलले आहे. मनाला भिडणारे सिनेमातील संवाद, हृदयाला स्पर्श करणारं संगीत आणि संगीताला लाभलेली गायकांची साद या जोरावर हा सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडला आहे. शंकर महादेवन, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे या मातब्बर कलाकारांनी आपापल्या भूमिकांना शंभर टक्के न्याय दिला आहे.
पुण्यात थाटात झाला सिनेमाचा प्रीमिअर
रिलीजपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर या सिनेमाचा खास प्रीमिअर सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला सिनेमाच्या कलाकारांसोबत पुणेकरांनी गर्दी केली होती. प्रीमिअरला सर्व कलाकारांमध्ये लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री अमृता खानविलकरने. प्रीमिअरला अमृता अगदी मराठमोळ्या अंदाजात अवतरली होती. हिरव्या रंगाच्या नऊवारीत अमृताचे सौंदर्य अधिकच खुलले दिसले.
या प्रीमिअरला क्लिक झालेली अमृता खानविलकर आणि इतर कलाकारांची खास झलक पाहा, पुढील स्लाईड्समध्ये...