आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katyar Kaljat Ghusali Will Have Grand Premiere In Mumbai On Diwali Pahat

मराठी celebsची दिवाळी पहाट होणार ‘कट्यार काळजात घुसली’च्या Grand Premiere ने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीमध्ये उटणे लावून अभ्यंगस्नान केल्यावर दिवाळीच्या फराळासोबतच सप्तसुरांनी दिवाळीची सुरूवात करण्याचा वर्षानुवर्षाचा रिवाज आहे. अनेक ठिकाणी ह्यासाठी सुरमयी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पण आपल्याला नेहमीच उत्सुकता असते, ती सेलिब्रिटी नक्की त्यांच्या दिवाळीची सुरूवात कशी करतायत, त्याची. यंदा मुंबईतले मराठी सेलिब्रिटी आपल्या दिवाळीची सुरूवात ‘एस्सेल व्हिजन’च्या ‘कट्यार काळजात घुसली’ने करणार आहेत.
१० नोव्हेंबरला नरकचतुर्दशीच्या दिवशी ‘कट्यार काळजात घुसली’चा दिवाळीपहाटच्या निमीत्ताने मोठा प्रिमीयर ठेवण्यात आला आहे. बातमीला दुजोरा देताना झी स्टुडियोचे बिझनेस हेड निखील सानेंनी सांगितलं, “दिवाळी पहाट करायला ‘कट्यार..’ शिवाय दुसरी सुरमयी आणि बेस्ट सुरूवात ती काय असणार. ह्याविचाराने आम्ही सेलिब्रिटींसाठी हा खास स्पेशल शो आयोजित केलाय. सध्या त्याच आमंत्रणांमध्ये मी व्यग्र आहे. आणि आपले सेलिब्रिटी एवढे आहेत, की, आम्ही बुक केलेले थिएटर कमी पडतंय. 12 नोव्हेंबरला फिल्म रिलीज होतेय. त्यादिवशी पुण्यातल्या सेलिब्रिटींसाठी आणि प्रेक्षकांसाठी खास शो आयेजित करण्यात येणार आहेत.”
सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’सोबत एस्सेल व्हिजन फिल्म रिलीज करतायत, म्हटल्यावर किती सिनेमागृहात हा सिनेमा झळकणार ह्याबद्दल उत्सुकता आहेच. निखील साने म्हणतात,” सलमानचा सिनेमा असला तरीही आमचं डिस्ट्रीब्युशन धडाक्यात आहे. महाराष्ट्रातल्या किमान ३०० सिनेमागृहांमध्ये तरी चित्रपट रिलीज होईलच. पण ह्यापेक्षाही जास्त सिनेमाहॉलमध्ये तो रिलीज होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही २००९ पासून दरवर्षाची सुरूवात मराठी चित्रपटाने व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. चार वर्ष तर आम्ही आमचेच मराठी चित्रपट वर्षाच्या सुरूवातीला रिलीज केले. मी तर म्हणतोय, आता कोणत्याही हिंदी अभिनेत्याला आणि चित्रपटाला न घाबरता मराठी फिल्म इंडस्ट्रीनेही आपले चित्रपट दिवाळीत रिलीज करायला हवेत. आम्ही सुरूवात केलीय, आता पाहूया पूढच्या वर्षी कोणती मराठी फिल्म हा ट्रेंड पूढे नेतेय.”
निखील साने हा इंटरव्हयु देत असतानाच, सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन पिळगांवकर आपल्या ‘कट्यार..’ चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये एन्ट्री मिळाल्याबद्दल आपला आनंद एकमेंकांना पेढे भरवून व्यक्त करण्यात व्यग्र होते.
दिग्दर्शक अभिनेता सुबोध भावे म्हणाले, “ही फिल्म रिलीज झाल्यावर ह्या फिल्म फेस्टिव्हलच्या तयारीला आम्ही सुरूवात करू. पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर इफीमध्ये जाण्याचा योग येणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कट्यार काळजात घुसली iffi साठी सिलेक्ट झाल्यावर चित्रपटातल्या कलाकारांनी कसा व्यक्त केला आनंद