आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBCचा पहिला विजेता हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे मराठी अॅक्ट्रेस, वाचा कसे आहे या कपलचे आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) चे नववे पर्व येत्या 28 ऑगस्टपासून सुरु होत आहे. 2000 साली या शोला सुरुवात झाली होती. अमिताभ बच्चन या पर्वाचे होस्ट होते, तर एक कोटी जिंकणारा पहिला विजेता ठरला होता मुंबईचा मराठमोळा तरुण हर्षवर्धन नवाथे. त्यावेळी हर्षवर्धन 27 वर्षांचे होते आणि आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये हर्षवर्धन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. 

पत्नी आहे मराठी अभिनेत्री...
हर्षवर्धन नवाथेंच्या पत्नीचे नाव सारिका नीलत्कर आहे. 2000 साली हर्षवर्धन केबीसीचे विजेते ठरले होते. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे 29 एप्रिल 2007 साली सारिका नीलत्करसोबत त्यांचे लग्न झाले. सारिका या मराठी चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमीवर कार्यरत आहेत. 'चाणक्य', 'जास्वंदी' या नाटकांत त्या अभिनय करत आहेत. शिवाय दुरदर्शनवरील 'गुलाम ए मुस्तफा' ही हिंदी मालिकेत त्यांनी काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या 'अजिंक्य' या चित्रपटात सारिका यांनी काम केले आहे. 2006 साली 'पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर' या चित्रपटात सारिका यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम केले होते. 2008 साली संदीप कुलकर्णींसोबत 'एक डाव संसारा'चा या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. 

सारिका-हर्षवर्धन यांचे अरेंज्ड मॅरेज...
सारिका आणि हर्षवर्धन यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज्ड मॅरेज आहे. कुठल्याही फिल्मी पार्टीत त्यांची भेट झाली नव्हती. आईवडिलांनी निवडलेल्या मुलीसोबत हर्षवर्धन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. थोरला मुलगा सारांश 8 वर्षांचा तर धाकटा मुलगा रेयांश 4 वर्षांचा आहे. हर्षवर्धन आता डच बेस्ड रिक्रूटमेंट कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.  
 
पुढे वाचा, केबीसीचे विजेते ठरल्यानंतर हर्षवर्धन यांनी काय केले होते एक कोटी रुपयांचे आणि सोबतच बघा हर्षवर्धन आणि सारिका यांच्या मुंबईतील घराचे खास फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...