आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ketaki Mategaonkar Working Out In Gym For Her Upcoming Marathi Movie Phuntroo

'फुंतरु'साठी केतकी जिममध्ये गाळतेय घाम, पाहा Workout करतानाची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शाळा', 'काकस्पर्श', 'तानी' आणि 'टाइमपास'नंतर अभिनेत्री केतकी माटेगावकर लवकरच मराठीतील पहिल्यावहिल्या सायफाय सिनेमासाठी तयार होतेय. तिच्या या आगामी सिनेमाचे नाव आहे 'फुंतरु' आणि त्याचे दिग्दर्शन करतोय सुजय डहाके. 'शाळा' या सिनेमात केतकी आणि सुजय डहाके यांनी एकत्र काम केले होते. खरं तर या सिनेमातून सुजयनेच केतकीला मराठी फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले.
आता 'फुंतरु'च्या निमित्ताने अभिनेत्री-दिग्दर्शकाची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. विशेष म्हणजे केतकी सुजयच्या या आगामी सिनेमासाठी फिट अँड फाइन होतेय. यासाठी तिने खास जिमिंग सेशन सुरु केले आहे. केतकीचा ही फिट अँड फाइन कसरत तिचा कोणता नवीन लूक समोर आणणार याची उत्सुकता आहे. केतकीच्या वर्कआउटची छायाचित्रे 'फुंतरु' या सिनेमाच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. ही छायाचित्रे बघता ती या सिनेमासाठी आपल्या लूकवर बरीच मेहनत घेत असल्याचे दिसून येतेय.
'फुंतरू' ही एक सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी आहे. केतकीसह या सिनेमात बालक-पालक'मधल्या भाग्याची अर्थातच अभिनेता मदन देवधर झळकणार आहे. मराठीतला पहिला साय फाय प्रेमपट असेलल्या या सिनेमाची निर्मिती अजय ठाकुर आणि वंदना ठाकुर यांची आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'फुंतरु'साठी जिमिंग सेशन करणा-या केतकीची वर्कआउटदरम्यानची छायाचित्रे...
(फोटो साभारः 'फुंतरु' सिनेमाचे ऑफिशिअल फेसबुक अकाऊंट)