आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय मल्हार : निसर्गाच्या साक्षीने रंगणार खंडोबा-बानूचा विवाहसोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जय मल्हार' मालिकेतील खंडोबा आणि बानू)

आपल्या देवादिकांच्या दंतकथा, मौखिक परंपरेने चालणा-या लोककथांमधून, पारंपरिक किर्तन आणि भारूडांमधून आजवर ऐकलेल्या खंडोबा बानूच्या लग्नाच्या रंजक कथा आता भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत 'जय मल्हार' या मालिकेतून. मणीचुल पर्वतावरील मणी - मल्ल या दैत्यांपासून जेजुरीचं रक्षण करण्यासाठी अवतरलेल्या खंडेरायांची गाथा अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांनी आजवर या मालिकेतून अनुभवली आहे.
मणी मल्लाचा वध, खंडेरायांचा राज्याभिषेक, म्हाळसादेवीसोबतचा विवाह, सारीपाटाचा डाव, खंडेरायांचा जेजुरीचा त्याग, खंडू गावडा बनून बाणाईच्या घरी कामासाठी राहणे या सर्व गोष्टी या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. खंडेरायांच्या गाथेतील या पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी बानूला दिलेल्या लग्नाच्या वचनपूर्तीचा सोहळा. बानूला दिलेल्या वचनाप्रमाणे आता खंडेराया तिच्याशी विवाह करणार आहेत. या विवाहासाठी अवघी सृष्टी सजणार आहे. देवादिकांसोबतच निसर्गाच्या साक्षीने रंगणारा हा नेत्रदीपक विवाहसोहळा येत्या रविवारी 3 मे रोजी झी मराठीवर सायंकाळी 7.30 वा. ‘जय मल्हार’च्या दोन तासांच्या विशेष भागातून प्रेक्षकांना बघता येणार आहे.
बानू आणि खंडेरायाच्या विवाहाच्या तयारीसाठी अवघी चंदनपुरी सजली आहे. हा विवाहसोहळा नळ राजाच्या राज्यात म्हणजेच नळदुर्गला पार पडणार आहे ज्यासाठी अवघी सृष्टी सज्ज झाली आहे. या विवाहासाठी आकाशाचा भव्य मंडप असणार आहे तर धरणी माता नव्या रुपात सजणार आहे, वृक्ष - वेली नटुन उभ्या राहणार आहेत. एकीकडे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे म्हाळसेला मात्र हा विवाह मान्य नाहीये. हा विवाह थांबवण्यासाठी तिने इंद्रदेवाला सोबत घेतलं आहे आणि ती खंडेरायांना रोखण्यासाठी निघाली आहे. या सर्व उत्कंठावर्धक घटना प्रेक्षकांना या विशेष भागात बघायला मिळणार आहेत.
या भागासाठी अतिशय उच्च दर्जाची ग्राफिक्स तंत्रमूल्ये वापरण्यात आली आहेत जी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथमच प्रेक्षकांना बघता येणार आहेत. याशिवाय या लग्न सोहळ्यासाठी एक खास गाणंही चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत ए.व्ही. प्रफुलचंद्र यांचे असून प्रवीण कुंवर यांनी ते गायलं आहे.
पुढे पाहा, खंडोबा-बानूच्या लग्नसोहळ्याची निवडक छायाचित्रे...