आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खंडोबा’ खेळणार MBCLमध्ये ‘धडाकेबाज’ क्रिकेट, देवदत्त सांगतोय, प्रॅक्टिस सेशनविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी बॉक्स क्रिकेट लीग म्हणजेच MBCLचं तिसरं पर्व यंदा कोल्हापूरात चार ते सहा मे दरम्यान आयोजित होतंय. पहिल्या पर्वात शिलेदार ठाणे आणि दुस-या पर्वात रत्नागिरी टायगर्सनी बाजी मारल्यावर आता तिस-या पर्वात कोण जिंकणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या सगळेच मराठी सेलिब्रिटी आपल्या टीमला जिंकवण्यासाठी क्रिकेटची जोरदार प्रॅक्टिस करतायत.
यंदा नवी मुंबईची क्रिकेट टीम बनलीय. ह्या धडाकेबाज नवी मुंबईकडून खंडोबा देवदत्त नागे खेळणार आहे. देवदत्तचा MBCLचा हा पहिलाच अनुभव आहे. तो ह्याविषयी सांगतो, “मराठी सेलिब्रिटींचं वैशिष्ठ्य असतं, की, ते जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा ते खेळाडूच असतात. आपलं ग्लॅमर आपलं स्टारपण ते विसरून जातात. लहानपणी गल्लीत खूप क्रिकेट खेळलोय. पण मराठी बॉक्स क्रिकेट लीगसाठी पहिल्यांदा खेळणार आहे. जय मल्हारच्या चित्रीकरणातून दोन दिवस सुट्टी घेतलीय. माझी बॉलिंग चांगली आहे. माझं स्पिनींग चांगलं आहे. बॅटिंगही चांगली आहे. त्यामूळे माझ्या टीमला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला ओव्हरआर्म खेळण्याची सवय आहे. पण बॉक्स क्रिकेट लीगमधले नियम वेगळे असतात. त्यात अंडरआर्म खेळावं लागतं. त्यामूळे हा अनुभव खूप वेगळा असणार आहे, मी खूप एक्सायटेड आहे.”
आपल्या क्रिकेटच्या प्रॅक्टिसविषयी तो पूढे म्हणतो, “सध्या जय मल्हारचे शुटिंग आणि क्रिकेट प्रॅक्टिस अशी धावपळ सुरू आहे. गेले १५-२० दिवस रोज सकाळी सात ते नऊ वाशीला प्रॅक्टिस सूरू असते. शाळेच्या मैदानात आम्ही प्रॅक्टिस करतो. त्यामूळे तिथे खूप लोकं आम्हांला पाहायला येतात. मग प्रॅक्टिस कमी आणि फोटोसेशन जास्त, अशी त-हा होते. जय मल्हारमूळे लोकांमध्ये माझी क्रेझ आहे. कोल्हापूरला यंदा जेव्हा शाहू स्टेडियमवर मॅच रंगेल, तेव्हाही भरपूर प्रेक्षक, मॅच पाहायला येतील. तेव्हा खरी धमाल असेल. आणि कदाचित चाहत्यांमूळे तारांबळही तेवढीच उडेल.”
देवदत्त सांगतो, “आमच्या क्रिकेट प्रॅक्टिस सेशनचं वैशिष्ठ्य असतं, ते म्हणजे आमच्या टीममधल्या किरण राजपूतच्या हातच्या कोथिंबीर वड्या. ती खूप मस्त कोथिंबीरवड्या बनवते. त्यामूळे खाणं, खेळणं आणि एकमेकांशी बॉन्डिंग होते.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण कोण आहे खंडोबा देवदत्तच्या धडाकेबाज नवीमुंबई टीममध्ये
बातम्या आणखी आहेत...