आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांपासून रंगमंचावर काम करतेय \'बकुळा\', \'खुलता कळी खुलेना\'मुळे पोहोचली घराघरांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेली खुलता कळी खुलेना ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका असणारी ही मालिका आता एका रंजक वळणावर आल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी ‘तुझं माझं ब्रेक अप’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'खुलता कळी खुलेना' या मालिकेने वर्षभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दरम्यान याकाळात मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली. यापैकीच एक पात्र म्हणजे 'बकुळा'. मोनिकाची पाठराखीण म्हणून बकुळाचा मालिकेत प्रवेश झाला. खास संवाद शैलीमुळे बकुळाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. बकुळा या भूमिकेला थोडा ग्रे शेड आहे. त्यामुळे हे पात्र लक्षात राहतं. ही भूमिका साकारणा-या अभिनेत्रीचे नाव आहे सीमा घोगळे-पारकर. 

विशेष म्हणजे सीमा छोट्या पडद्यावर फारशी अॅक्टिव नसली, तरी गेल्या 19 वर्षांपासून ती रंगभूमीवर कार्यरत आहे. अनेक गाजलेल्या नाटकांतून तिने भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेने वेगळी ओळख मिळवून दिली असल्याचे सीमा सांगते. आता ही मालिका निरोप घेत असल्याने सीमा थोडी भावूक झाली आहे. या मालिकेतील कलाकारांसोबतचा एक कोलाज सोशल मीडियावर शेअर करुन एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 

सीमा म्हणते, खुलता कळी खुलेना"..... आणि एक पर्व संपलं...गेले 5 महिने "बकुळा" या व्यक्तीरेखेद्वारे मी घराघरात पोचले... गेली 19 वर्षे रंगमंचावर काम करत असताना जेवढं प्रेम आणि आशिर्वाद मिळाले.. तेवढंच किंबहुना जरा जास्तच या व्यक्तीरेखेमुळे मिळालं... खूप नवीन आणि उत्तम माणसं जोडली गेली. खूप काही शिकता आलं.. सकाळी लवकर उठून डबे बनवणं, वेळेवर सेट वर पोहचणं, प्रवासातल्या गमती जमती, सेट वर दर 2 तासानी खाणं, पदार्थाला ओम ने नाव ठेवणं (आणि तरीही मिटक्या मारत खाणं), माझ्या आणि अभिज्ञाच्या सीनमध्ये जागा काढणं आणि त्यासाठी दिग्दर्शकाला मस्का मारणं, पॅकअप या शब्दासाठी आतूरतेनं वाट बघणं, पॅकअप नंतर आज कोण ड्रॉप करणार याचा विचार करणं..... हे सगळं खूप मिस करणार आहे. Zee Marathi team आणि सगळे तंत्रज्ञ ह्यांचे खूप खूप आभार."

अनेक गाजलेल्या नाटकांतून साकारल्या भूमिका...
सीमाने या 19 वर्षांच्या काळात अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा, सुरक्षित अंतर ठेवा, रात्रीस खेळ चाले, 26 52 उन्हापावसाची बेरीज वजाबाकी, शिकस्त, टू बी कन्टिन्यूड ही तिची अलीकडच्या काळातील गाजलेली नाटकं आहेत. 
 
विवाहित आहे 'बकुळा'..
बकुळा अर्थातच सीमा खासगी आयुष्यात विवाहित असून एका मुलाची आई आहे. अमित पारकर हे तिच्या पतीचे तर वरद हे मुलाचे नाव आहे. 
 
पुढे वाचा, सकाळी 5 वाजता उठून मयुरी देशमुखसाठी बनवले होते खास पदार्थ आणि सोबतच बघा बकुळा अर्थातच सीमाचे खासगी आयुष्यातील खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...