Home »Bollywood »Marathi Cinekatta» Khulata Kali Khulena Mansi Engagement Photos

Telly World:अखेर सलीलची स्वप्नपुर्ती, मानसीसोबत झाला साखरपुडा...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 16:23 PM IST

विक्रांतच्या वडिलांनी समजूत घातल्यानंतर अखेर मानसी सलीलसोबत साखरपुड्यासाठी तयार झाली. विक्रांतच्या आई-वडिलांनी एक पाऊल पुढे टाकत सलीलच्या आईची भेट घेतली आणि सलील मानसीच्या साखरपुड्याची तारीख निश्चित केली. मानसीची थोरली बहिण मोनिकामुळे दळवी कुटूंब देशपांडे कुटूंबावर नाराज आहे. त्यामुळे विक्रांतच्या आई-वडिलांनी घेतलेला निर्णय त्यांना पसंत पडलेला नाही. पण मानसीच्या प्रेमापोटी त्यांनी हे सर्व घडवून आणले. दुसरीकडे मानसीसोबत लग्नाचे स्वप्न रंगवणारा सलील साखरपुडा होत असल्याने अतिशय आनंदात आहे. मानसीच्या प्रेमात सलीलने साखरपुड्याची जय्यत तयारी केली आहे.
विक्रांतलासुध्दा मानसी-सलीलच्या साखरपुड्याचे आमंत्रण मिळाले असून, त्याने सुध्दा मानसीला साखरपुड्याचे येण्याचे प्रॉमिस केले आहे. पाहुया या खास क्षणांचे फोटोज...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा खास फोटोज...
(फोटो सौजन्य झी मराठी)

Next Article

Recommended