आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'खुलता कळी खुलेना\'मधली मानसी रिअल लाईफमध्ये आहे विवाहित, जाणून घ्या तिच्या जोडीदाराविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. मोनिका-विक्रांत-मानसी या तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती ही मालिका गुंफण्यात आली आहे. मोनिकाच्या भूमिकेला ग्रे शेड आहे, तर मानसी अतिशय सोज्वळ रुपात पडद्यावर दिसतेय. सध्या मालिकेत मानसीसाठी तिच्या आजीआजोबांनी वरसंशोधन सुरु केले आहे. विक्रांतसुद्धा मानसीची लग्नासाठी मानसिक तयारी करुन घेतोय. आता पडद्यावर मानसीला तिचा जोडीदार कधी गवसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना प्रतिक्षा करावी लागणारेय. खासगी आयुष्यात मात्र मानसी अर्थातच अभिनेत्री मयुरी देशमुखला तिचा साताजन्मीचा जोडीदार मिळाला आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मानसी विवाहबद्ध झाली आहे. अभिनय क्षेत्रात आहे मयुरीचा नवरा...

आशुतोष भाकरे हे मयुरीच्या जोडीदाराचे नाव आहे. आशुतोषसुद्धा अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तीन मराठी सिनेमांमध्ये आशुतोष झळखला आहे. इचार ठरला पक्का, बायको असावी अशी आणि भाकर या सिनेमांमध्ये आशुतोषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.विशेष म्हणजे आशुतोषची मध्यवर्ती भूमिका असलेल्या भाकर या सिनेमाचे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर झाला होता. आता आशुतोष 'ब्लँकेट' या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आशुतोष मुळचा नांदेडचा आहे.

वयाच्या 25 व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली मयुरी...
मयुरी 25 वर्षांची आहे. 29 ऑक्टोबर 1992 रोजी तिचा जन्म झाला. मयुरीचे मुंबई आणि विशाखापट्टणम येथे शिक्षण झाले आहे. तिने अॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई आणि रिशी विद्यालय गुरुकुल, विशाखापट्टणम येथून शिक्षण घेतले आहे. कॉलेज जीवनात अनेक नाटकांमधून तिने कामं केली. 'प्लेझंट सरप्राईज' या व्यावसायिक नाटकात सौरभ गोखले आणि प्राजक्ता माळीसोबत ती झळकली आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि आता मयुरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मयुरी एका छोटेखानी भूमिकेत रुपेरी पडद्यावरसुद्धा झळकली आहे. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमात मयुरीने पत्रकाराची भूमिका वठवली आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मयुरी आणि आशुतोषचा वेडिंग अल्बम दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मयुरी-आशुतोषची साखरपुडा आणि लग्नाची खास छायाचित्रे आणि सोबतच शेवटच्या स्लाइडवर असलेला लग्नाचा खास व्हिडिओ बघायला विसरु नका...

फोटो सौजन्यः Dream Catchers co. आणि मयुरी देशमुखचे फेसबुक पेज
बातम्या आणखी आहेत...