आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then and Now:आता अशी दिसतेय 'जुम्मा-चुम्मा' गर्ल, बोल्ड सीन्समुळे झाली होती फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट 'हम'मधील 'जुम्मा चुम्मा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री किमी काटकर आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री पूनम ढिल्लनने किमी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होतेल त्यात किमी यांचा बदललेला लुक दिसला होता. किमी यांनी 'टार्जन' (1985)  या चित्रपटातून बोल्ड सीन्स देऊन लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटात हेमंत बीर्जेने काम केले होते. चित्रपटांत होणारे शोषणामुळे किमी यांनी चित्रपटापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 1992 साली 'हमला' या शेवटच्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. किमी यांना खटकले चित्रपटसृष्टीतील शोषण...
 
 
किमी काटकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील शोषण आणि त्यांच्या कामाची पद्धत याबद्दल कटुता होती. त्यांनी चित्रपटसृष्टी सोडताना सांगितले की, मी चित्रपटसृष्टीपासून कायमची दूर जात आहे. अॅक्टींग आणि चित्रपट सृष्टीतील शोषण हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यांना हिंदी चित्रपटक्षेत्रातील वाढते पुरुषांचे वर्चस्व मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केले. 
 
आज किमी यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी...
 
बोल्ड सीनमुळे झाले होते फेमस..
किमी काटकर यांते चित्रपटातील करिअर ऐशी ते नव्वदीच्या काळात सुरु झाले होते. 1985 साली पत्थर का दिल या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले होते.  त्याच वर्षी त्या टार्झन चित्रपटात झळकल्या होत्या. यातील बोल्ड सीन्समुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी 'मर्द की ज़ुबान' (1986), 'मेरा लहू' (1987), 'दरिया दिल' (1988), 'जैसी करनी वैसी भरनी' (1989), 'जलजला' (1987), 'शिव शक्ति' (1987), 'खोज' (1989), 'हमसे ना टकराना' (1990), 'शेरदिल' (1990), 'जीवनदाता' (1990), 'सरफिरा' (1991) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
 
अचानक सोडली होती चित्रपटसृष्टी..
किमी काटकर जितके दिवस चित्रपटसृष्टीत होत्या तितके दिवस त्यांची छवी एक बोल्ड अॅक्ट्रेस म्हणून राहिली. 1990 नंतर त्या चित्रपट क्षेत्रातून अचानक गायब झाल्या. 
 
फोटोग्राफरसोबत केले आहे लग्न..
करिअरच्या पडत्या काळात त्यांनी अॅड फिल्म निर्माता शंतनू शोरेसोबत विवाह केला. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम केले नाही. किमी काटकर काही वर्षे पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलिया येथे राहिल्या. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. 
 
अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी किमी काटकर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, किमी काटकर यांचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...