आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा टीव्ही अभिनेता 15 वर्षानंतर पत्नीपासून घेणार काडीमोड, घटस्फोटाच्या बातमीवर म्हणाला असे काही..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'कहानी घर घर की' या मालिकेतून भाऊ-बहीण अशी प्रेक्षकांसमोर आलेली जोडी किरण कर्माकर आणि रिंकू यांचे लग्न तुटण्याच्या वाटेवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरण आणि रिंकू हे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत आणि आता लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहेत असे कळते.

 

आमच्या प्रतिनीधींशी बोलताना किरण करमारकर यांनी सांगितले की, "मी आणि रिंकू गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहोत हे खरे आहे. आमच्या दोघांमध्ये काही मुद्दयांवरुन वाद सुरु आहेत ज्याबद्दल मी काही बोलु इच्छित नाही. आम्ही दोघेही समंजस आहोत आणि एकमेकांच्या सहमतीने वेगळे राहत आहोत पण आम्ही असा कोणताच निर्णय घेणार नाही ज्यामुळे आमच्या मुलावर त्याचा परिणाम होईल." 

 

किरणने सांगितले की, "मी आमच्या घटस्फोटाविषयी कोणतीच माहिती देऊ इच्छित नाही. काही गोष्टी पर्सनल असतात आणि त्या पर्सनल राहणेही तितकेच गरजेचे आहे. घटस्फोट आणि आमचे रिलेशन याबद्दल कोणतीच माहिती देऊ इच्छित नाही."

 

किरण करमारकर आणि रिंकू यांची पहिली भेट एकता कपूरचा शो 'कहानी घर-घर की' (2000) मध्ये झाली होती. मालिकेत  त्यांनी भाऊ-बहीण अशी भूमिका केली होती.  काही दिवसांच्या मैत्रीनंतर त्यांनी एका वर्षात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता आणि 2001 साली साधेपणाने लग्न केले होते. किरणने अनेक मराठी चित्रपटांतही काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रिंकू आणि किरण यांचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...