आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या या कृत्याने नाराज झाला होता हा मराठी टी.व्ही अभिनेता, आता लवकरच घेणार घटस्फोट !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेता किरण करमारकर आणि त्यांची पत्नी रिंकू सध्या वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. लग्नाच्या 15 वर्षानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. किरण आणि रिंकू यांनी कहान घर घर की या मालिकेत सोबत काम केले होते आणि त्यानंतर एकाच वर्षात त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण आता वैयक्तिक कारणाने दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहे. या एका घटनेने पत्नीवर नाराज झाला होता किरण...

 

रिंकू टीव्ही क्षेत्रात सक्रिय आहे. तिने ये वादा रहा या मालिकेत निगेटीव्ह भूमिका केली होती. याच मालिकेत रिंकूने तिच्या भूमिकेसाठी एका एपिसोडमध्ये खरेखुरे टक्कल केले होते. पती किरणला तिचा भूमिकेसाठी घेतलेला हा निर्णय अजिबात आवडला नव्हता पण रिंकूने तरीही भूमिकेसाठी ते केले. पती या गोष्टीवर नाराज झाल्याची बातमी खुद्द रिंकूने प्रसारमाध्यमांना दिली होती. 

किरण करमारकर आणि रिंकू यांची पहिली भेट एकता कपूरचा शो 'कहानी घर-घर की' (2000) मध्ये झाली होती. मालिकेत त्यांनी भाऊ-बहीण अशी भूमिका केली होती. काही दिवसांच्या मैत्रीनंतर त्यांनी एका वर्षात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता आणि 2001 साली साधेपणाने लग्न केले होते. किरणने अनेक मराठी चित्रपटांतही काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रिंकूचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...