आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Dil Dosti Duniyadari Fame Ashu Aka Pushkaraj Chirputkar

'दिल दोस्ती दुनियादारी'मध्ये स्वच्छंदी आयुष्य जगणारा 'आशू' रिअल लाइफमध्ये आहे इंजिनिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता पुष्कराज चिरपुटकर)
तरुणाईची मालिका असलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत स्वच्छंदी आयुष्य जगणारी, मित्रांसाठी वाढदिवसाच्या पार्टीज आयोजित करणारी, आपल्याला नेमून दिलेले काम निमुटपणे पार पडणारी, प्रत्येकाच्या मदतीला धावणारी व्यक्ती म्हणजे आशु. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेला आशु पुढे जाऊन काही गुन्हेगारांच्या संपर्कात येतो. त्याने स्वतः काही गुन्हा केला नसला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसमवेत तो काहीकाळ राहिलेला असतो. अशा वातावरणातून पळून आलेला आशु आता मुंबईत येऊन स्थिरावला आहे. सुजय, अॅना, रेश्मा, मीनल आणि कैवल्य या मित्रांसोबत तो आनंदात जगतोय. त्यांच्या सुख-दुःखात त्यांना साथ देतोय. अल्पावधीतच आशु प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. दाढी-मिशीतील त्याचा लूक तरुणाईला आवडला आहे.
मात्र आशु कोण आहे, त्याचे खरे नाव काय आहे, तो खासगी आयुष्यात कसा आहे, त्याची दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील निवड कशी झाली, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? काय म्हणता नाही... चला तर मग तुमची उत्सुकता फार ताणून न धरता आम्ही तुम्हाला हा आशु कोण आहे, ते सांगतो.
अभिनेता पुष्कराज चिरपुटकरविषयी...
मालिकेत आशुतोष उर्फ आशू ही व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्याचे खरे नाव पुष्कराज चिरपुटकर आहे. मुळचा पुण्याचा असलेल्या पुष्कराजने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. पुष्कराज पुण्याच्या एका थिएटर ग्रूपसोबत प्रायोगिक नाटक करत होतो. त्या नाटकाच्या माध्यमातून त्याला दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या ऑडिशनसाठी विचारणा झाली. त्यानंतर रीतसर ऑडिशन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून त्याची या मालिकेसाठी निवड झाली. या मालिकेपूर्वी पुष्कराजने काही कार्पोरेट अॅड फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्ससाठी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शिवाय पुण्यात इंग्लिश थिएटर आणि प्रायोगिक नाटकात तो काम करतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दिल दोस्ती दुनियादारी'मधील आशुचा अर्थातच अभिनेता पुष्कराजचा लक्ष वेधून घेणारा खास अंदाज...