आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन आणि शुभांगी गोखलेंची लेक आहे \'दिल दोस्ती...\' फेम सखी, रिअल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सखी गोखले, इनसेटमध्ये दिवंगत अभिनेते मोहन गोखले, शुभांगी गोखले)
झी मराठी वाहिनीवर गाजत असलेली आणि तरुणाईची मालिका म्हणून ओळखल्या जाणा-या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने नुकतेच 100 यशस्वी भाग पूर्ण केले आहेत. सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य या सहा मित्रांवर मालिकेचे कथानक आधारित आहे. या मालिकेत तसे पाहता सर्वच तरुण कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सहा जणांमध्ये सर्वात साधीभोळी असलेली, आपल्या मित्रमैत्रिणींची काळजी घेणारी रेश्मा सर्वांचे लक्ष वेधून घेते.
पडद्यावर अगदी साधीभोळी दिसणारी रेश्मा खासगी आयुष्यात कशी आहे, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.
दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखलेंची मुलगी आहे सखी
रेश्माचे खरे नाव सखी मोहन गोखले आहे. 29 जुलै 1993 रोजी जन्मलेली सखी 22 वर्षांची आहे. तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील दिवंगत अभिनेते मोहन गोखले आहेत, तर आईचे नाव शुभांगी गोखले आहे. मोहन गोखले यांनी अनेक मराठी-हिंदी सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मोहन गोखले यांनी ‘माफीचा साक्षीदार’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘कैरी’ अशा अनेक मराठी सिनेमात आणि ‘स्पर्श’, ‘आदत से मजबूर’, ‘मिर्च मसाला’, ‘हिरो हिरालाल’ या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. चेन्नई येथे कमल हासन यांच्या 'हे राम' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेले असताना 29 एप्रिल 1999 मध्ये वयाच्या 46 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
शुभांगी गोखलेंविषयी...
शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी 'आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मराठी मालिका आणि 'लापतागंज' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत.
मालिकेपूर्वी हिंदी सिनेमात झळकली आहे सखी...
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली. मात्र या मालिकेपूर्वी तिने हिंदी सिनेमातही काम केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? 2013 मध्ये रिलीज झालेल्या रंगरेज या हिंदी सिनेमात तिने वेणू हे पात्र रेखाटले होते.

पडद्यावर साधीभोळी दिसणारी सखी रिअल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस आणि फन लविंग
सखी मालिकेत अगदी साधीभोळी आणि नेहमी सलवारसूटमध्येच दिसते. मात्र खासगी आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आणि फन लविंग आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर उपलब्ध असलेल्या सखीच्या छायाचित्रांवरुन तिचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळतो. शिवाय ती फन लविंग असल्याचेही कळते.
सखी खासगी आयुष्यात कशी दिसते, हे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
नोटः सखीची सर्व छायाचित्रे तिच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.