आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Actress Jui Gadkari Is Celebrating Her Diwali

जुई गडकरीचा Diwali Plan: वसुबारस शांतीवन आश्रमात, दिवाळी पहाटला गाणार कपालेश्वर मंदिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेलीसोपच्या काही एक्टर्सना दिवाळीच्या दिवसातही काम करावे लागत असले, तरीही अभिनेत्री जुई गडकरी मात्र आता दिवाळीसाठी सुट्टीवर गेलीय. तिचे दिवाळीचे प्लॅन्स सुध्दा ठरलेत.
जुई म्हणते, “ वसुबारसपासून दिवाळी साजरी करायची, पूर्वापार पध्दत चालत आलीय. म्हणून माझी दिवाळी ही वसुबारसपासूनच सुरू होते. हा पहिला दिवस ज्यांचं कुणी नाही. ज्यांना समाजाने आपल्यातून बाजूला काढलंय. जी लोकं निराधार आहेत. अशा लोकांसोबत दिवाळी साजरी करून सुरू होतो. माझा कॉलेजचा जवळ जवळ शंभरजणांचा ग्रुप आहे. माझ्या ह्या ग्रुपसोबत मी शांतीवन आश्रमात जाते. ह्या आश्रमात कुष्ठरोगग्रस्त लोक आहेत. तसेच काही ज्येष्ठ नागरिकसूध्दा राहतात. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही तिथे त्यांना भेटवस्तू घेऊन जातो. आश्रमात त्यांच्यासाठी रांगोळ्या काढतो. पणत्या, आकाशकंदिल लावतो. त्यादिवशी गोडा-धोडाचं छान जेवण आम्ही त्यांना देतो. त्यांच्यासाठी दोन तासांचे नाच-गाण्याचे कार्यक्रमही करतो. आणि मग तो आनंद घेऊन घरी परततो.”
जुई तिच्या घरच्या दिवाळीविषयी सांगते, “आमचं मोठ्ठ कुटूंब आहे. जे गणपती आणि दिवाळीत आमच्या कर्जतच्या घरी एकत्र येतं. त्यामूळे गणपती आणि दिवाळीत काहीही झालं तरीही माझी शुटिंगला दांडी असतेच. सगळी भावंड एकत्र जमून कल्ला केला जातो. सगळेजण एकत्र येऊन आम्ही फराळही बनवतो. ह्यात आमच्याकडे चकल्या आणि चिवडा जास्त बनतो. कारण आम्हा भावंडांना येता-जाता चघळायला काही तरी हवंच असतं. ह्यावर्षी माझी आजी गेल्यामूळे यंदा नेहमीप्रमाणे खूप मोठं सेलिब्रेशन होणार नाही.”
जुई गडकरीला पुढचं पाऊलमधून फक्त अभिनय करतानाच तिच्या प्रेक्षकांनी पाहिलंय. मात्र जुई चांगली गाते सुध्दा. तिचा खास गायनाचा कार्यक्रम कर्जतवासियांना दिवाळी पहाटच्यादिवशी ऐकता येतो. जुई सांगते, “ आमच्या कर्जमध्ये खूप प्रसिध्द शंकाराचं मंदिर आहे. ह्या कपालेश्वर मंदिरात दरवर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो. असा एकही मोठा गायक नसावा, ज्याने कपालेश्वर मंदिरात दिवाळी पहाटमध्ये गायलं नसेल. एवढं हे प्रसिध्द मंदिर आहे. मी अगदी चिमुरडी असल्यापासून नियमीतपणे ह्या मंदिरात दिवाळीपहाटच्या कार्यक्रमात गाते. आता जवळ-जवळ अठरा ते वीस वर्ष मी ह्या मंदिरात गातेय. यंदा हा कार्यक्रम पाडव्याला होणार आहे. आणि आता सुट्टीत जरा गायनाची रिहर्सल करून मग दिवाळी पहाटला मी देवळात गाणं सादर करेनं.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी साजरी जुई गडकरीचे दिवाळी साजरी करतानाचे फोटो