आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Make In India Stage Caught Fire When Pooja Sawant Performing Lavani

थोडक्यात बचावली पूजा सावंत, परफॉर्मन्सवेळी कशी लागली आग? वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर रविवारी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या कार्यक्रमात अभिनेत्री पूजा सावंत स्टेजवर लावणी परफॉर्मन्स करत होती, पण तिच्या फक्कड लावणीवर नेहमी टाळ्या आणि शिट्यांची बरसात व्हायची तिला सवय आहे. पण ह्यावेळी मात्र स्टेजवर अचानक आग लागली. काय झालंय? हे समजायच्या आत पूजासकट इतर नृत्यांगनांना आणि उपस्थित मान्यवरांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं खरं. पण पूजाला ह्या गोष्टीचा जबर धक्का बसला.
प्रचंड घाबरलेल्या पूजाला तिचे आई-वडिल लगेच घरी घेऊन आले. पूजाची लहान बहिण रूचा सावंत म्हणाली, “पूजा सध्या घरी आलीय. पण झालेल्या प्रकाराबद्दल शॉकमध्ये आहे. ती अजिबात बोलू शकत नाहीये. ती मंचावर नाचत असताना ठिगणी उडाली आणि आग पेटली. त्यामूळे मंचावरच्या इतर नृत्यांगनांसकट दीदीला बॅकस्टेजला नेण्यात आलं. माझ्या वडिलांचंही महानाट्य होणार होतं. त्यांचा तर कॉस्च्युमसकट सर्व सामान ह्या आगीत जळून खाक झालं. पण आई-वडिलांसह पूजा आता घरी परतलीय. तिला कुठेही इजा झालेली नसली तरीही अचानक झालेल्या ह्या प्रकाराने तिला चांगलाच धक्का बसलाय.”
पूजा सावंतच्या लावणीनंतर अभिनेत्री अंजना सुखानीचा लावणी परफॉर्मन्स होता. पण अचानक लागलेल्या आगीने तिला विंगेतूनच परतावं लागलं. अंजना म्हणते, “पूजाचा परफॉर्मन्स आटपतच आला होता. अगदी शेवटी काही सेकंद राहिली होती. माझी लगेच एन्ट्री होती. मी स्टेजवर एन्ट्री घेण्यासाठी विंगेत यायला आणि आग भडकायला एकच गाठ पडली. तीस सेकंदाचाच फरक पडला. तीस सेकंदानंतर जर आग भडकली असती, तर स्टेजवर मी असते. पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. स्टेजच्या समोर परफॉर्मन्सवेळी फायर ब्लास्टसाठीची जी व्यवस्था असते. त्यात काही बिघाड झाला. आणि हवा एवढी होती. की स्टेजला क्षणार्धात आगी लागली. पण सुदैवाने आम्ही सगळेच बचावलो.”
इशा कोप्पीकर ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती. ती म्हणते, “लावणी परफॉर्मन्सनंतर मला स्टेजवर जाऊन कार्यक्रम पूढे न्यायचा होता. बॅकस्टेजला मी लावणी संपायची वाट पाहत असतानाच अचानक खूप धूर झाला. बॅकस्टेजला उभे असणा-या आम्हांला वाटलं हा स्टेजवरच्या एक्टमधलाच काही प्रकार असावा. त्या परफॉर्मन्ससाठी काही धूर करून विशेष परफॉर्मन्स असावा. पण जेव्हा लोकं आग, आग अशी ओरडू लागली. आणि आम्हांला तिथून ताबडतोब बाहेर काढण्यात आलं. तेव्हा मी नक्की काय झालं म्हणून पाठी वळून पाहिल्यावर दिसलं, तर प्रचंड मोठी आग स्टेजला लागली होती.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा चालला होता पूजाचा परफॉर्मन्स आणि लागली आग