आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता खानविलकरसारखे बारीक व्हायचंय? मग Follow करा तिचा Diet Plan

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता खानविलकर
नुकत्याच झालेल्या 'नच बलिये-७'मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरची बारीक फिगर सगळ्यांनीच पाहिली. लवचिक अंग, आणि सडपातळ बांधा फक्त अभिनेत्रींकडेच नाही, तर तो आपल्याकडेही असू शकतो. त्यासाठी फक्त अभिनेत्रींसारखं खाणं-पिणं आणि व्यायाम करण्याची गरज असते. पण ब-याचदा सेलेब्स फक्त प्रोटिन डाएट किंवा हाय-फायबर ड्रिंक घेत असतील, असतील असा आपला गैरसमज असतो.
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या फिगरच गुपित आहे, तिचं घरातलं आणि मराठी पध्दतीचं जेवणं. त्यामुळेच अमृता सारखी फिगर आता आपलीही बनू शकते. म्हणूनच वाचा, अमृता खानविलकरने दिलेल्या ह्या डाएट आणि खाण्या-पिण्याच्या टिप्स
अमृता देतेय व्यायामाच्या टिप्स-
शरीराला रोज व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. आपण माणूस असल्याने, आपण व्यायामाशिवाय चिरतरूण राहणे शक्य नाही हे लक्षात ठेवा. आणि रोज न चुकता व्यायाम करा. सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी करा. जीममध्ये जा, किंवा घरच्या घरी करा. मी रोज दोन तास न चुकता व्यायम करते. आणि मगच माझ्या दिवसाची सुरूवात होते. व्यायामाने चेह-यावर आपोआप तजेला येतो. कारण तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स घामावाटे निघायला मदत होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अमृतासारखी फिगर हवी असल्यास काय खावं?