आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stunning Photos Of Shahrukh Khan’s Co Star In FAN Shriya Pilgaonkar!

शाहरुखसोबत झळकणा-या या अॅक्ट्रेसचे Stunning फोटोज बघून तुम्हीही व्हाल तिचे \'जबरा फॅन\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणा-या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का? बरोबर ही आहे अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया यांची लाडकी लेक श्रिया पिळगावकर. अलीकडेच तुम्ही तिला शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर पाहिले आहे. नुकताच श्रियाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'फॅन' हा सिनेमा रिलीज झाला आहे. पहिल्याच बॉलिवूड सिनेमातून श्रियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची यशस्वी सुरुवात करणारी श्रिया मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीसोबतच श्रिया दिग्दर्शिका म्हणूनही ती नावारुपास येतेय. रंगभूमीवरसुद्धा ती रमते.

आज श्रियाचा आज वाढदिवस आहे. तीन वर्षांपूर्वी श्रियाने सचिन पिळगावकर यांचीच निर्मित असलेल्या ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील श्रियाच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात 'पेटेंड सिग्नल' (2012) आणि 'ड्रेसवाला' (2013) या शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून केली होती.

श्रियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयीच्या ब-याच काही गोष्टी...
रंगभूमीवर रमते...
श्रियाने दोन इंग्रजी नाटकांमध्ये काम केलंय. अॅक्वेरिअस प्रॉडक्शन्सच्या 'कॉमन पीपल' आणि 'इंटर्नल अफेअर्स' ही दोन इंग्रजी नाटकं गेल्यावर्षी रंगभूमीवर आली. विनोदी शैलीची ही नाटकं करताना रंगभूमीवरच्या कामाचा अनुभव खूपच आनंददायी आणि शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू ठेवणारा असल्याचे श्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते.
अनुराग बसूसोबत काम करण्याची संधी...
दिग्दर्शक अनुराग बसूची निर्मिती असलेल्या 'रिअल एफ एम' या टेलीफिल्मचे दिग्दर्शन तिने केले आहे. या सिनेमाची कथा अनुरागचीच आहे, मात्र त्याचे दिग्दर्शन आकर्ष खुराणा याने केले. या सिनेमासाठी सेकंड युनिट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी श्रियाला मिळाली.
ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाच्या फ्रेंच सिनेमात श्रियाची वर्णी...
श्रिया पिळगावकर एका फ्रेंच सिनेमात चमकली आहे. ऑस्कर विजेता दिग्दर्शक क्लॉड लेल्यूश यांच्या आगामी 'अ प्लू युन' या फ्रेंच सिनेमात श्रिया दिसली. दोन प्रेमकहाण्या सांगणा-या या रोमँटिक सिनेमात ती पाहुण्या कलाकाराच्या मात्र महत्त्वाच्या भूमिकेत होती. मुंबईतल्या एका अभिनय कार्यशाळेत तिचा अभिनय बघून या प्रोजेक्टच्या ऑडिशनसाठी तिला बोलावण्यात आलं होतं. तिचं काम आवडल्यानं तिला हा आंतराराष्ट्रीय सिनेमा मिळाला. या आंतरराष्ट्रीय सिनेमात ती एका भारतीय अभिनेत्रीचीच भूमिका करतेय.
श्रियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिचा खास अंदाज छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत... तिचा या छायाचित्रातील स्टनिंग लूक बघून नक्कीच तुम्हीही तिचे जबरा फॅन व्हाल...