आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know More About Dil Dost Duniyadari Fame Pooja Thombare

\'दिल दोस्ती दुनियादारी\'मधील अॅना आहे मुळची बीडची, अभिनयातच नव्हे नृत्यातही पारंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणारी आणि तरुणाची मालिका म्हणून ओळखल्या जाणा-या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेला नुकतेच यशस्वी 100 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील सुजय, अॅना, आशू, कैवल्य, मीनल आणि रेश्मा हे पात्र जणू आपल्या घरातील एक अविभाज्य भागच बनले आहेत. या मालिकेत सर्व मित्रमैत्रिणींमध्ये सर्वात भोळीभाबडी असलेले पात्र म्हणजे अॅना. अभिनेत्री पूजा ठोंबरे हे पात्र साकारत आहे.
मालिकेला 100 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अॅना अर्थातच पूजाविषयीची काही खास माहिती सांगत आहोत.
मुळची बीडची आहे पूजा...
पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. येथील केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. तिने शालेय जीवनापासून ते आतापर्यंत अगणित पुरस्कार पटकावले आहेत. ई टीव्ही, झी मराठी तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून अभिनय व नृत्याचे कसब पणाला लावत मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत मायानगरीत आपले स्थान निर्माण केले आहे.
बालनाट्य शिबिरातून गिरवली अभिनयाची बाराखडी...
बीड नाट्य परिषद आणि केएसके महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने उन्हाळी बालनाट्य प्रशिक्षण घेतले जाते. याच शिबिरातून अभिनयाची बाराखडी गिरवत पूजाने नाट्यशास्त्राचा अभ्यास केवळ पूर्ण केलाच असे नाही, तर नैपुण्यदेखील मिळवले. बीड येथे ‘राजा राणीला घाम हवा’ या बालनाट्यातून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला गती मिळत गेली. द डम डान्सर, बियाँड द डिझायर, शिल्पकोष्टक यासारख्या नाटकांतून भूमिका करत पूजाने नाट्यशास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. ललित कला केंद्रात शिक्षण घेतले. आहे.
मालिकेतील पूजाच्या भूमिकेविषयी थोडेस...
वसईतील टिपिकल कॅथलिक कुटुंबात वाढलेली सोज्वळ अशी अॅना!! आईवडिलांच्या सततच्या भांडणाला वैतागून तिने घर सोडले आणि या दोस्तांना येऊन मिळाली. असिस्टंट डिझायनर म्हणून एका डिझायनिंग स्टुडीओमध्ये ती नोकरी करते. अॅना मनाने निर्मळ आणि प्रामाणिक स्वभावाची आहे. भोळ्याभाबड्या स्वभावाची अॅना पटकन कोणावरही विश्वास ठेवते. कधी कधी तिला काही गोष्टी उशिरा समजतात आणि त्यावर ती उशिरानेच प्रतिक्रिया देते. यशस्वी डिझायनर होण्याचे तिचे स्वप्नं आहे, शिवाय आईवडिलांना पुन्हा एकत्र आलेले ती पाहू इच्छिते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहुयात, 'दिल दोस्ती दुनियादारी'मधील अॅनाच्या अर्थातच पूजाच्या विविध अदा...