आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृणाल कुलकर्णीचं nick name आहे ’म्रिटा’, हे हटके नाव ठेवलं कोणत्या co-actorने? जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी गेली अनेक वर्ष हिंदी-मराठी मालिका आणि सिनेमामधून काम करताना आपल्याला दिसतेय. तिच्या २८ वर्षांच्या करीयरमध्ये आजपर्यंत तिला कधी कोणी टोपणनाव ठेवलं नव्हतं. पण आता सिध्दार्थ मेननने मात्र तिला एक nickname दिलंय. सिध्दार्थला मृणालला ‘म्रिटा’ अशी हाक मारतो.
ह्या हटके टोपणनावाविषयी मृणाल कुलकर्णी divyamarathi.comला सांगते,” सिध्दार्थने आणि मी ‘राजवाडे एन्ड सन्स’ ही फिल्म एकत्र केली होती. ह्या सिनेमामूळे आमच्यात गंमतीशीर कनेक्शन झालं होतं. सिनेमात सिध्दार्थचं नाव विराजस होतं. आणि ख-या आयुष्यात माझ्या मुलाचं नावही तेच आहे. ह्या दोघांच्या वयात थोडा फरक आहे, इतकचं. सिनेमाच्यावेळी तो माझ्याकडे आला, आणि मला म्हणाला, मी तूला कोणत्या नावाने हाक मारू?... मी त्याला म्हटलं, तूला बिन्धास्त ज्या नावाने हाक मारावी तशी मारू शकतोस.”
ती पूढे सांगते, “मग हळू हळू तो मला सकाळी मेसेजेस करून ‘म्रिटा गुड मॉर्निंग’ असं म्हणू लागला. पहिल्यांदा मला हे वेगळंच नाव कळेना. कारण मी इतक्या सिनेमात आणि मालिकांमध्ये काम केलं. पण मला असं कोणी टोपण नाव ठेवलं नव्हतं. ह्याअगोदर मला लोकं मृणाल मॅडम, मृणाल किंवा मृणालताई म्हणायची.”
सिध्दार्थ मेनन ह्याविषयी स्पष्टीकरण देतो. तो म्हणाला, “मी आणि मृणालताई आता खूप जवळचे मित्र झालोयत. ओळख झाली होती, तेव्हा सगळेच तिला मृणाल ताई म्हणायचे. मग मी ही तेच म्हणायचो. मृणाल ताई ही हाक जरी तिला अंगवळणी पडली होती. तरीही ती सूध्दा सारखं सारखं मृणाल ताई आणि मृणाल मॅडम ऐकून कंटाळली होती. त्यामूळे मग तिला काय हाक मारावी, जे तिला आवडेल असा प्रश्न पडला.”
तो सांगतो,“मृणाल ताईचा मग ओघानेच आणि नकळतच शॉर्टफॉर्म झाला. बोलताना मी तिला ‘मृ’ ताई म्हणू लागलो. नंतर तर ताई मधलंही ‘ई’ लोप पावला. आणि ‘ता’ राहिला. आणि मग एक दिवस ‘म्रिटा’ अशी हाक मी तिला मारू लागलो. आणि त्यामूळे आता हळू हळू ‘एन्ड जरा हटके’ सिनेमातले सगळेच ‘म्रिटा’ हाक मारू लागलेत. ते बोलायलाही सोयिस्कर पडतं. आणि तिलाही आवडतं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, म्रिटा आणि सिध्दार्थचे हटके फोटो
बातम्या आणखी आहेत...