आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Actor Shashank Ketkar Don\'t Like Big Celebration In Ganpati Utsav

Celebrity Ganesha: गणेशोत्सवमंडळांची दादागिरी वाढत चाललीय, सांगतोय शशांक केतकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक रस्त्याला उत्सवी रूप आलेलं असतं. कुठे मोठ्या गणेशमूर्ती तर कुठे मोठी आरास, कोण आपला मांडव मोठा उभारतं, तर कोण मांडवालाच प्राचीन मंदिराचं रूप देतं. हौसेला मोल नाही. पण हे सगळं अभिनेता शशांक केतकरला बिलकूल आवडतं नाही.
शशांकशी ह्याविषयावर गप्पा मारायला सुरूवात केली. तेव्हा तो म्हणाला, “ सर्व देवांमध्ये जास्त मला गणपती लाडका आहे. पण म्हणून मी देवभोळा नाही. आणि नास्तिकही नाही. मला भक्तीचं अवडंबर आवडत नाही. आजकाल गणेशोत्सवाला मार्केटिंगची साथ मिळालीय. गणेशोत्सवाचंही मार्केटिंग होतं. भक्ती लोप पावतं चाललीय. आणि गणेशोत्सवात लॅव्हिशतेला महत्व येऊ लागलंय. त्यामूळेच मग कोणाची मूर्ती भव्य तर कोणाची आरास. बहूतांश गणपतीच्या मंडपांच्या बाहेर मोठमोठ्याने गाणी चालली असतात. आजूबाजूच्यांना त्या ध्वनी प्रदूषणाने नको जीव व्हावा, ह्याचीच जणू दक्षता घेतली जाते.”
शशांक मुळचा पुण्याचा आहे, तर आता तो मुंबईत स्थायिक झालाय. मुंबई-पुण्यातले गणेशोत्सव तर त्याला जास्त खटकतात. तो म्हणतो, “ पुण्यातल्या विसर्जन मिरवूकीला तर दिवसेन्दिवस जास्तीत जास्त भव्यता येऊ लागलीय. ह्या विसर्जनादिवशी पुणे बंद असते. अनेकांना तर चक्क तीन दिवस घरीच राहावं लागते. मुंबईत काही वेगळी कथा नाही. मुंबईच्या चौपाट्यांवर कशी गर्दी होते. ते आपण पाहिलंच. मग ह्यातच चेंगराचेंगरी होते. आणि स्त्रीयांची छेडछाडही.”
गणेशभक्त असला तरीही सणांच्या उत्सवीस्वरूपाला शशांकचा विरोध आहे. तो म्हणतो, “३०-३० फुटी मूर्ती उभारणं, गणेशमंडळांमध्ये स्पर्धा लागणं, ह्यामुळे भक्ती तर संपुष्टात आलीच आहे. पण ह्या गणेशमंडळांची दादागिरी वाढत चाललीय. त्या दहा दिवसात ते त्या एरियाचे दादा असतात. आपल्या इथे एखाद्याने सार्वजनिक मंडळांच्या दादागिरीविरूध्द आवाज जरी उठवायचा, म्हटला तर, त्याला स्वत:च्या आणि स्वत:च्या घरच्यांच्या, जीवाची भीती बाळगावी लागते. रस्त्यात खड्डे खणून मंडप उभारण्याला तर माझा विरोध आहेच. आपल्याकडे नाच-गाणी म्हणजे सण असं चुकीच समीकरण होऊ लागलंय. सार्वजनिक गणेशोत्सवांना तर आता बिभत्स स्वरूप आलंय. ”
(फोटो-प्रदिप चव्हाण)
शशांक केतकरला आवडते फेस्टिव्हल साजरे करण्याची परदेशातली पध्दत .. का? जाणून घ्या पुढील स्लाइडमध्ये