आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘& जरा हटके’मध्ये मृणालला ‘मम्मा’ म्हणणारी शिवानी, लहानपणी तिला ‘काकू’ म्हणायची, का? वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘& जरा हटके’ सिनेमामध्ये मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रंगोले आई-मुलीच्या नात्यात दिसणार आहे. ह्या सिनेमात जरी पहिल्यांदाच त्या स्क्रिनस्पेस शेअर करत असल्या, तरीही शिवानी आणि मृणाल एकमेकींना खूप वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यात एक स्पेशल बॉन्ड आहे.
शिवानी आणि मृणाल दोघीही पूण्याच्या. मृणालविषयी विचारल्यावर शिवानी रंगोले सांगते, “ मी पूण्यातल्या एका नाटकाच्या ग्रुपमध्ये काम करायचे. एका इंग्रजी नाटकाच्या प्रयोगानंतर मला प्रकाश कुंटेने ही फिल्म ऑफर केली. आणि ह्यात माझ्या आईची भुमिका मृणाल कुलकर्णी करणार असल्याचं सांगितलं. लहानपणापासून मी मृणालताईचं काम पाहत आल्याने आणि तिला लहानपणापासून ओळखत असल्याने मला कधीतरी तिच्यासोबत काम करता यावं, असं वाटायचं.”
पण ह्या दोघींच्या स्पेशल बॉन्डविषयीचा शेवटी मृणाल कुलकर्णीनेच खुलासा केला. तिने सांगितलं, “माझ्या मुलाच्या विराजसच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये शिवानी होती. लहानपणापासून ती त्यांच्या एकांकिकांच्या, नाटकाच्या रिहर्सलसाठी आमच्या घरी येत असे. आणि मग “काकू पाणी हवंय’ असं सहज हक्काने हाक मारून माझ्याशी बोलणारी ही शिवानी एक दिवस मोठी झाली, आणि माझ्यासोबत आता ती सिनेमात काम करतेय.”
‘& जरा हटके’ सिनेमा करण्याअगोदर मृणालला काकू असं बोलणारी शिवानी आता मात्र तिला ताई म्हणू लागलीय. ती म्हणते, “लहानपणी तिला मृणाल काकू बोलणा-या माझ्यासाठी ती सिनेमातली आई झाली. आणि फिल्म इंडस्ट्रीत माझ्या वयाचे सगळेच तिला मृणाल ताई बोलत असल्याने तिला मी सूध्दा ताई म्हणू लागले.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, & हटके करण्याअगोदर कशी दिसायची Deglam शिवानी रंगोले
बातम्या आणखी आहेत...