आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपदा-महेशच्या लग्नात ‘दिल दोस्ती..’चे व-हाडी? ‘नांदा..’मध्ये कशी पोहोचली माजघरातली मंडळी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपदा-महेशचं आणि स्वानंदी-नीलचं लग्न लागलं. त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्यावर मालिकेच्या सेटवर एक नवं नाट्य चालू झालं होतं, ललिताबाईंना लग्नाच्या हॉलमध्ये चक्क बिल्डर भेटले होते. एकिकडे स्वानंदी-नील सात फेरे घेत होते. तर दुसरीकडे ललिता कात्रीत सापड्याने, आनंदीत होऊन वच्छी मावशी पाहत होत्या. सेटवर एवढं महत्वाचं नाट्य रंगत असताना सेटच्या बाहेर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतं होती.
‘दिल दोस्ती दुनियादारी’चे दोस्तमंडळी चक्क ‘नांदा सौख्य भरे’च्या कलाकारांना भेटायला आले होते. आणि ते संपदा-महेश, स्वानंदीचे आई-बाबा, काका-काकू आणि सेटवरच्या इतर कलाकारांसोबत गप्पा मारण्यात आणि फोटो काढण्यात बिझी होते. एखाद्या मालिकेचा महाएपिसोड असला की, दुस-या मालिकेतले कलाकार पाहूणे मंडळी म्हणून तिथे येण्याची एक टेलिव्हीजन विश्वात प्रथा आहे. त्यामूळे असं काही, असावं असं तुम्हांला वाटू शकतं.
संपदा-महेशसोबत फोटो काढणा-या दिल दोस्तीच्या कैवल्य, एना, मिनल आणि आशुमूळे ही महेशची दोस्तमंडळी म्हणून मालिकेत एन्ट्री मारणार असा फोटोंवरून तुमचा गैरसमजही होऊ शकतो. पण तसं काही नाहीये.
‘दिल दोस्ती दुनियादारी’चे हे चारही कलाकार सहज म्हणून मालिकेच्या सेटवर आले होते. झालं असं की, ‘नांदा सौख्य भरे’चा लग्नाच्या हॉलचा सेट जिथे होता. त्याच्याच अगदी वर ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा सेट होता. त्यामूळे माजघरातली मंडळी लग्नमंडपाच्या बाहेर दिसत होती.
आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर ह्याविषयी divyamarathi.comशी बोलला. तो म्हणतो, “एरवी तेच ते चेहरे आम्ही मालिकेच्या सेटवर पाहतो. पूर्ण बिल्डींगमध्ये कधीकधी तर आम्ही एकटेच असतो. नेहमी मी माझ्यासोबतच्या पाच जनावरांना पाहतो. आता जरा माणसांना पाहूया, असा विचार करून ब्रेकमध्ये आम्ही नांदाच्या सेटवर पोहोचलो. बाकी कलाकारांना भेटून जरा बरं वाटलं.”
संपदा म्हणजेच रेश्मा शिंदेकडे पाहून तो म्हणाला, “ह्या सेटवर पण आम्हांला आमच्या मालिकेसारखीच एक रेश्माताई दिसली. पण आमच्या रेश्माताईसारखी ही ताई काही पोहे बनवतं नाही. त्यामूळे आता परत आमच्या सेटवर पोहे खायला पळतोय.”
तो सेटवर जायला निघणार तेवढ्यात त्याला ‘नांदा..’च्या सेटवर आलेल्या आदेश बांदेकरांनी पकडलं. आणि ‘आज रात्रीच्या एपिसोडमध्ये काय होणार, ते सांगून जा’, असा धोशा लावला.
(स्वप्निल चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कैवल्य आणि मिनल काय म्हणाले 'नांदा शौख्य भरे'च्या कलाकाराविषयी