आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाफ तिकीट फिल्मच्या युनिटला पोलिसांनी टाकलं तुरूंगात, का? वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समीत कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट फिल्म येत्या २२ जुलैला रिलीज होतेय. फिल्म दोन लहानग्यांविषयीची असली तरीही, ती चित्रीत करणं, ही छोटी गोष्ट नव्हती. दिग्दर्शक समीत कक्कड ह्यांनी खरं तर ह्याअगोदरची त्यांची फिल्म आयना का बायना ही सुध्दा मुलांना घेऊनच बनवली होती. पण समीर हाफ तिकीटला सर्वात कठीण फिल्ममेकिंग मानतात.
समीत म्हणतात, “ आयना का बायना फिल्मपेक्षा ही फिल्म बनवणं जास्त कठीण होतं. कारण आयना का बायनाची मुलं डान्सर्स होती. त्यामुळे एक्टिंग, कॅमेरा ह्याविषयी त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागली नव्हती. पण हाफ तिकीटमधली ही दोन्ही मुलं त्यांच्यांहून लहान तर होतीच. पण त्यांना कॅमेरा, एक्टिंग सगळंच शिकवायचं टेन्शन होतं.”
“एकतर ३३ दिवसांमध्ये शुटिंग पूर्ण करण्याचं प्रेशर माझ्यावर होतं. मग मी ह्या दोघांची वर्कशॉप्स घेतली. ज्यामध्ये मी ह्या दोघांना झोपडपट्टीत घेऊन गेलो. उन्हात भरपूर चालायला लावलं. वेगवेगळ्या घाणेरड्या नाल्यांतून मी त्यांना फिरवलं. मला त्या मुलांना आजूबाजूच्या वातावरणाला कम्फर्टेबल करून घ्यायचंय होतं. पण पहिल्याचं सीनला ह्या दोन्ही मुलांनी ती ‘बाप’ आहेत हे दाखवलं. पहिला शॉटचं त्यांनी वन टेक ओके केला. त्यामूळे मी खूपच चक्रावून गेलो होतो. मुलांची आकलन क्षमता किती चांगली असते, ते मग मला लक्षात आलं.”
हाफ तिकीट फिल्म मुंबईतल्या वेगेवेगळ्या लोकोशन्सवर चित्रीत झालीय. ६०पेक्षा जास्त लोकेशन्स ह्या सिनेमात दिसणार आहेत. ह्यात सगळ्यात जास्त कठीण कोणत्या जागी चित्रीकरण करणं होतं, असं विचारल्यावर समीत कक्कड म्हणाले, “सगळ्यात जास्त कठीण होतं, रेल्वे ट्रँकवर चित्रीकरण करणे. आमच्याकडे रेल्वे ट्रॅकवर चित्रीकरण करण्याची परवानगी नव्हती. ट्रॅकवर चित्रीकरणाची परवानगी रेल्वे देत नाही. पण एका सिक्वेन्समध्ये दोन्ही बाजूने ट्रेन जातेय आणि मध्ये दोन्ही मुलं उभी आहेत, असे चित्रीकरण करणे गरजेचे होते.”
“मग आम्ही तीन कॅमेरे घेऊन चित्रीकरण करायचे ठरवले. आणि दिवसभराच्या चित्रीकरणात आता फक्त शेवटचा सीन चित्रीत होणे, राहिलं असताना पोलिसांनी आम्हांला पकडलं. आमचं आख्खं युनिट, ठाणे रेल्वे पोलिसांच्या तुरूंगात आणि कॅमेरे, शुटिंगची सामग्री, सगळं त्यांच्या ताब्यात होतं. आमचे अक्षरश: धाबे दणाणले होते.”
समीत म्हणतात, “रेल्वे पोलिस जरी त्यांच्या जागी बरोबर असले, तरीही आम्हांला तसंच शुटिंग करणं चित्रपटाच्या संहितेप्रमाणे गरजेचे होते. मग आम्ही त्यांना सगळी संहिता वाचून दाखवली. चित्रपटाची कथा समजावली. आणि मग सरतेशेवटी दिड-दोन तासांनी आमची सुटका झाली.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नक्की कोणता तो सीन होता ज्यामुळे हाफ तिकीट सिनेमाच्या संपूर्ण युनिटला घडला तुरूंगवास
बातम्या आणखी आहेत...