आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Mahesh Manjarekar Was Feared While Doing Film With Nana Patekar

माझं आणि नानाचं भांडणं होईल ह्याची मला भीती वाटतं होती, महेश मांजरेकरांची प्रांजळ कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' ह्या चित्रपटाचा प्रोमो एकाच आठवड्यापूर्वी युट्युबवरून रिलीज झालाय. वि वा शिरवाडकरांचं अजारमर नाटक नटसम्राट जेव्हा सिल्व्हर स्क्रिनवर येतंय, तेव्हा त्याविषयी उत्सुकता चित्रपट अनाउन्स केल्यापासून होतीच. फस्ट लूक प्रोमो झळकल्यावर तर आता ती वाढलीय.
चित्रपटात नाना पाटेकर ‘गणपत रामचंद्र बेलवलकर’ बनून ‘To be or not to be that is the question.. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे’,’कोणी घर देता का घर’ असे प्रश्न विचारतात, तेव्हा पून्हा एकदा कुसुमाग्रजांच्या अद्भूत शब्दसंपदेचा पुन:प्रत्यत येतो.
आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारतानाचा अनुभव सांगताना नाना पाटेकर म्हणतात, “पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पाहिलेलं एक अजरामर नाटकं असतं, तुमच्या नाट्यजाणिवा वध्दिंगत होताना, जेव्हा तुमच्यावर एखादं नाटकं चिरंतन काळासाठी छाप सोडतं. अशा नाटकांवर सिनेमा बनतो. आणि दत्ता भट, सतिश दुभाषी, डॉक्टर श्रीराम लागू, यशवंत दत्त, राजा गोसावी, चंद्रकांत गोखले ह्यांनी अजरामर केलेली भूमिका सिनेमातून आपल्याला करायला मिळते, तेव्हा ही गोष्ट निश्चितच अभिमानस्पद होती. आम्ही सगळे त्या चित्रपटाने एवढे झपाटलो होतो, की, ६५ दिवसांचं शेड्युल आम्ही ३५ दिवसांमध्ये पूर्ण केला. वि वा शिरवडकरांनी लिहीलेले संवाद तोंडपाठ होतेच.
अभिनेत्री नेधा मांजरेकर ह्यांनी ह्या चित्रपटात आप्पासाहेबांच्या पत्नीची कावेरीची भूमिका साकारलीय. मेधा मांजरेकरचं कौतुक करताना ते पूढे म्हणतात, “ मुख्य म्हणजे आप्पा बेलवकराला कावेरीही साजेशी मिळालीय. मेधाने अप्रितम काम केलंय. आणि कावेरी मुर्तीमंत उभी केलीय. तिची खासियत म्हणजे, अनेकदा ती चित्रपटात डोळ्यांनीच बोलते. तिच्या डोळ्यातले बोलके भाव पाहून आता वाटतं, आमची कावेरी जरी मुकी असती ना, तरी ती हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचवू शकली असती. एवढा तिने चोख अभिनय केलाय.”
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणातात, “नटसम्राट करताना मी खूप घाबरलेलो. कारण माझं आणि नानाचं भांडणं होईल ह्याची मला भीती वाटतं होती. कारण आम्ही दोघंही तापट आणि फटकळ आहोत. पण तसं काहीच झालं नाही. आणि सिनेमा व्यवस्थित पूर्ण झाला. नाना एवढा त्या भूमिकेत शिरला होता की, चित्रपट उत्तमरित्या होऊ शकलाय. जेव्हा एखादा अभिनेता एवढा झपाटलेला असतो, तेव्हा दिग्दर्शक म्हणून आपणही २०० टक्के जास्त चांगले काम करू शकतो.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नटसम्राट चित्रपटाचा फस्ट लूक टिझर