आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गजानना गणराया गाण्यावर नाचण्याचं सुरूवातीला आलं होतं टेन्शन’ – प्रार्थना बेहेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘झी गौरव’ पुरस्कार सोहळ्यात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि श्रेया बुगडेने गणेशवंदना सादर केली आहे. वैभवने गेल्यावर्षी संजयलीला भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात चिमाजीआप्पांची भूमिका केली होती. त्यामुळे ह्या सिनेमातल्याच दोन गाण्यावर श्रेया, प्रार्थना आणि वैभव तिघांनी मिळून परफॉर्मन्स केला.
‘बाजीराव मस्तानी’मधल्या ‘गजानना’ गाण्यावर प्रार्थना, वैभव आणि श्रेयाने परफॉर्मन्स दिल्यावर वैभवने ह्याच सिनेमातल्या ‘मल्हारी’ गाणे परफॉर्म केले.
परफॉर्मन्सविषयी सांगताना प्रार्थना बेहेरे म्हणते, “ आम्ही जवळ-जवळ दिड ते दोन दिवस रिहर्सल केली. मी आत्तापर्यंत नेहमीच अवॉर्ड फंक्शनमध्ये स्लो किंवा रोमँटिक गाण्यांवरच परफॉर्मन्स दिले होते. अशा फास्ट गाण्यावर परफॉर्मन्स मी पहिल्यांदाच देतेय. त्यामुळे सुरूवातीला मला थोडं टेन्शन आलं होतं. हे गाणं फास्ट मुव्हमेन्ट्स आणि भरपूर एनर्जी लागणारं गाणं होतं. पण आमचा कोरीओग्राफर सँडीने मला धीर दिला.”
ती पूढे सांगते,“मी, श्रेया आणि वैभवने पहिल्यादिवशी वेगवेगळी रिहर्सल केली होती. आणि टेक्निकल रिहर्सललाच आम्ही भेटलो होतो. पण आमच्या तिघांचीही एकमेकांशी मैत्री असल्याने नाचताना लागणारं को-ओर्डिनेशन पटकन जुळून आलं. मी भरतनाट्यम शिकलेय. पण श्रेया खरं तर नॉन-डान्सर आहे. त्यामुळे रिहर्सलवेळी तिला जश्या कम्फर्टेबल होती, तशाच स्टेप्स आम्ही निवडल्या.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि श्रेया बुगडेचा परफॉर्मन्स
(फोटो- स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...