आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराटमूळे स्वत:च्या घरी जाण्याचीही चोरी झालीय, रिंकु राजगुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट सिनेमा एवढा सुपरडुपर हिट झाला, की, सिनेमाने आजपर्यंत मराठी सिनेमात झालेले सगळे रेकॉर्ड तोडले. ८५ कोटींची कमाई केली. एवढंच नाही, तर रिंकु आणि आकाशला तरूणाईच्या गळ्यातलं ताईत बनवलं.
आज रिंकु-आकाशला अवघा महाराष्ट्र ओळखतो. खरं तर अवघ्या महाराष्ट्राला रिंकु-आकाशमूळे याड लागलंय. पण हे याडं लागणं, आता केवढं भीतीदायक झालंय, हे सांगताना रिंकु म्हणते, “पहिल्या-पहिल्यांदा खूप मजा वाटायची. लोकं आपल्यासोबत सेल्फी काढतायत. आपल्याला ओळखतायत. पण आता मात्र आम्ही कंटाळलोयत. रात्री १२ वाजतासुध्दा रस्त्यावर उतरणं मुश्कील झालंय. आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय. कुठेही गेलो तरी तिचं स्थिती आहे. लोकं अगदी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत आमची वाट पाहत ताटकळत उभे असतात. स्वत:च्या घरी जाण्याचीही चोरी झालीय.”
असं असलं तरीही सैराटमूळे रिंकु-आकाशला ख-या अर्थाने आपल्या गावाबाहेरचं जग पाहायला मिळालं. आकाश म्हणतो, “एवढ्या माणसात फिरलो नव्हतो. कधी मुंबई पाहिली नव्हती. कधी आम्ही विमानात बसलो नव्हतो. परदेशात गेलो नव्हतो. हे सगळं सैराटमूळे करता आलं. कॅमेरा काय असतो, ते कळलं. अभिनय काय असतो, ते कळलं. सगळ्याचं गोष्टी पहिल्यांदा कळल्या. त्यामूळे आमच्यासाठीही हा अगदी सैराटमय अनुभव होता.”
रिंकु-आकाशचं व्यक्तिमत्व-विकास करण्यामध्येही सैराटचा खूप महत्वाचा वाटा आहे. ती म्हणते, “कसं बोलावं, कसं वागावं, इथपासून ते मेकअप कसा करतात इथपर्यंत अनेक गोष्टी कळल्या. खरं तर आजही मला मेकअप करायला आवडत नाही. पण किमान नीट दिसण्यासाठी आता स्वत:ची स्वत: पावडर लावता येते. आणि काजळही लावायला आता मी शिकलीय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सैराटच्या हिरो-हिरोइनच्या फॅफॉलोविंगचे फोटो
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)