आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का लपले Silver Screenवरचे हे lovebirds दुकानात आणि पार्किंग लॉटमध्ये? वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेचे ‘लग्न कुठे करायचे पुण्याला की मुंबईला’ हे प्रोमोज युट्युबला पाहायला मिळतायत. त्यांच्या ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ चित्रपटात सुध्दा लग्नाची लगबग चाललेली दिसतेय. लग्नासाठीच्या शॉपिंगचे आणि स्वप्निल-मुक्ताच्या रोमँसचे काही सिक्वेन्स आपल्याला मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यावर चित्रीत झालेले दिसणार आहेत. हे सिक्वेन्स चित्रीत करताना मात्र स्वप्निल-मुक्तासह दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि चित्रपटाच्या युनिटच्या नाकीनऊ आले होते.
शुटिंग दरम्यानच्या आठवणी सांगताना मुक्ता बर्वे म्हणते, “ मुंबई-पुणे-मुंबई-२ मध्ये आता गौरी आणि गौतमचं लग्न होतंय. त्यामुळे आता लग्नाची शॉपिंग ही आलीच. आणि ती पुण्यात करायची असेल. तर लक्ष्मीरोड, टिळक रोडवरच्या लग्नसराईसाठी प्रसिध्द असलेल्या दुकानात जाणे आलेच. एका दुकानातून आम्ही शॉपिंग बॅग घेऊन बाहेर पडतो. असा सिक्वेन्स होता. आणि आम्ही शुटिंग करतोय म्हटल्यावर आम्हांला पाहायला ही तुडूंब गर्दी झाली होती. एवढी की लक्ष्मीरोड अख्खा माणसांनीच फुलून गेला होता.”
“चित्रीकरणात ती गर्दी न दाखवता गौरी गौतम दुकानातून शॉपिंग बॅग घेऊन बाहेर पडतायत, असं दिसणं आवश्यक होतं. पण काही केल्या तसा सिक्वेन्स करताच येत नव्हता. मग आम्हा दोघांना दुकानातच लपवून ठेवण्यात आलं. जवळ-जवळ तासभर आम्ही दुकानातच होतो. आम्ही दोघं मागच्या बाजूने गेलो, अशी अफवा दोनदा पसरवली. पण लोकं हुशार होती. ती काही हलायला तयार होईनात. शेवटी आम्ही तसाच पटकन बाहेर येऊन सिक्वेन्स पूर्ण केला. आणि नशीबाने तो पहिलाच टेक ओके झाला.”
मुक्ता मुंबईचा अनुभव सांगते, “लग्नाअगोदरचे आमचे काही रोमँटिक सीन मरीन ड्राइव्ह आणि शिवाजी पार्कमध्ये करायचे होते. पोलिस परमिशन घेतली होती. मध्यरात्रीच मुद्दामहून शुटिंग करत होतो. पण तिथेही आम्हांला रात्री गर्दीला सामोरं जावंच लागलं. मुंबई-पुणे-मुंबई-२ च्या चित्रीकरणादरम्यान क्रेझी फॅन फॉलोविंग काय असते, ते अनुभवलं. ”
ह्याविषयीचं चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात, “ पाच वर्षात स्वप्निल-मुक्ताची फॅन-फॉलोविंग किती वाढलीय, ह्याचा अनुभव मला आला. पूर्वी तुळशीबागेत त्यांचा मी ३० सेकंदाचा सिक्वेन्स तरी घेऊ शकायचो. आता ३ सेकंदही त्यांना तिथे उभं ठेवणं मुश्कील आहे.”
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का लपवलं स्वप्निल मुक्ताला पार्किंग लॉटमध्ये