आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On set: स्वप्निल जोशी का चिडवतो, त्याच्या Heroines ना, ‘खजूर गँग’ जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्निल जोशी सध्या संजय लीला भन्सालीच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हया चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी करतेय. तर चित्रपटात त्याच्या हिरोइन्स असणार आहेत, अंजना सुखानी आणि स्नेहा चव्हाण. ह्या चित्रपटात अभिनेत्री समिधा गुरूसुध्दा एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
स्वप्ना, अंजना, समिधा आणि स्नेहा ह्या चौघीजणींना स्वप्निल जोशी ‘खजूर गँग’ म्हणून चिडवतो. त्यामूळे आता समिधा गुरूने आपल्या ह्या गँगला नुकतेच खजूराचे चित्र असलेले चहा-कॉफी प्यायचे मग गिफ्ट केलेत.
हे ‘खजूर गँग’ म्हणजे नक्की काय, आणि हे असं आगळं गिफ्ट देण्याविषयी समिधाला विचारल्यावर ती म्हणते, “आम्ही लोणावळ्याला जेव्हा ह्या चित्रपटाचे शुटिंग करत होतो, तेव्हा मधल्यावेळात भूक लागते म्हणून खायला काहीतरी घेऊन जायचो. मी, नेहा, स्वप्नाताई आणि एन्जी(अंजना सुखानी) आम्हांला चौघींनाही खजूर आवडतात. तर आम्ही चौघी ते नियमीत खाऊ लागलो. त्यामूळे मग आम्हांला स्वप्निल आणि सेटवरची सगळी लोकं ‘खजूर गँग’ म्हणून चिडवू लागलीयत. आता नुकताच एन्जीचा वाढदिवस झाला. तर विचार केला, हेचं औचित्य साधून आपल्या ‘खजूर गँग’ला एक छान आठवणीत राहणारं गिफ्ट द्यायला हवं. म्हणून कॉफीमग आम्हा चौघींसाठी खास मग बनवून घेतले. ”
समिधाने हे कॉफीमग आपल्या गँगसाठी बनवण्याशिवाय आपल्या लाडक्या एन्जीला छान कानबाली गिफ्ट केले. समिधा म्हणते, “इतके दिवसात आता एन्जी माझी बहिणच झालीय. तिला छान कानातले आवडतात. हे मला माहित होतं. त्यामूळे मी तिला ते गिफ्ट केले. आणि तिचा आनंद गगनात मावत नव्हता.”
युनिट मेंबर्सनी अंजनासाठी चार केक आणले होते. आणि प्रत्येकजण तिला दिवसभर फुलं गिफ्ट करत होता. त्यामूळे अंजना खूप भारावून गेली होती. ती म्हणते,”हा वाढदिवस खूप मेमरेबल होता. माझ्यावर सगळे फुलांचा वर्षाव करत होते. मराठी फिल्म इंडस्ट्रीत मी नवीन असूनही ह्या लोकांनी मला आपलंस केल्याने छान वाटतंय. स्वप्नील, स्वप्नाताई आणि समिधा तर सध्या माझे मराठी ट्युटर झालेत. माझ्याशी सेटवर मराठीतच संवाद साधला जातो. त्यामूळे मला आता चांगलं मराठी येतंय. गेल्या काही दिवसात मी डबलसीट, प्यारवाली लव्हस्टोरी, डॉ. प्रकाश बाबा आमटे, मितवा, क्लासमेट, चेकमेट, टाइमपास असे भरपूर मराठी चित्रपट पाहिलेत.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय गिफ्ट दिलं स्वप्नील जोशीने आपल्या हिरोइनला