क्रांतीने फक्त divyamarathi.com सोबत साजरा केला वाढदिवस
अभिनेत्रींचे सिल्व्हऱ स्क्रिनवरचे आयुष्य जसे रंगीत असते. तसेच त्यांचे पर्सनल आयुष्यही रोज सप्तरंगी असते, असे
आपल्याला वाटते. पण सिल्व्हर स्क्रिनवर ग्लॅमरस दिसणा-या अभिनेत्री आपल्या आयुष्यातली पर्सनल फंक्शन्स मात्र ब-याचदा अत्यंत डि-ग्लॅम पध्दतीने साज-या करतात. क्रांती रेडकरला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटल्यावर ह्या गोष्टीची जाणीव झाली.
मराठी घरांमध्ये रोज जसे वातावरण असते, तसेच क्रांतीच्याही घरी होते. कुठेही तिच्या वाढदिवसाचा भपका नव्हता. आणि क्रांती भेटली तेंव्हा एक साधा पांढरा-निळा सलवार-कुर्ता घालून आणि अगदी नावाला काजळ आणि लिपस्टिक लावून आली. Divyamarathi.comने तिला वाढदिवसाला सरप्राइज व्हिजीट देताच, ती खूप खूश झाली. तिने तो एगलेस केक कापला, आणि न राहवून दोन तुकडेही खाल्ले.
क्रांती म्हणते, “काल रात्री आई-बाबंसोबत ब्रिंग-इन साजरा केला. आणि आता सकाळी उठल्यावर divyamarathi.comने हे प्लेझंट सरप्राइज दिलं. हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर कापलेला पहिला केक. आणि आता ह्यानंतर दिवसभर सेलिब्रेशन सुरू होणार.”
वाढदिवसाबद्दल सांगताना क्रांती पूढे म्हणते, “ वाढदिवस म्हणजे, तो माझा दिवस असतो. त्यामुळे मी कोणताही उगाच साज-शृंगार वगैरे करत नाही. माझ्या जवळच्या लोकांनाच फक्त भेटते. काल रात्री आई-बाबांसोबत छोटेखानी सेलिब्रेशन झाल्यावर आता तू आणलेला बर्थ-डे केक कापून मठात चाललेय. त्यानंतर माझ्या बहिणींना भेटणार. आणि त्यानंतर अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींना. मी वाढदिवसाच्या दिवशी कधीच काम करत नाही. आणि कोणत्याही फिल्मी-स्टाइलच्या मोठमोठ्या पार्ट्याही करत नाही.”
क्रांती रेडकरने आपल्या चित्रपटांनी गेले एक-दिड दशक गाजवलंय. चित्रपसृष्टीतले तिचे जवळचे असे काही मित्र-मैत्रिण मात्र तिला आवर्जून शुभेच्छा देतात. ती सांगते,” दर वाढदिवसाला सकाळी केदार शिंदे आणि भरत जाधव ह्यांचा फोन तर आलाच पाहिजे, हा गेल्या काही वर्षांमधला नियम झालाय. तसा तो आज सकाळी आला. माझ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या दोन बेस्ट फ्रेंड्स आहेत. फुलवा खामकर आणि उर्मिला कानिटकर. ह्या दोघी काही ना काही सरप्राइज घेऊन येतात. आता काल रात्री त्या आल्या नाहीत. आणि आज सकाळपासून त्यांचा फोन नाही. म्हणजे रात्री काहीतरी सरप्राइज नक्की आहे.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, क्रांती सांगतेय, तिच्या someone Special बद्दल