Home »Bollywood »Marathi Cinekatta» Kranti Redkar Gets Married To Sameer Wankhede

क्रांती रेडकरने थाटले गुपचूप लग्न, कोण आहे तिचा 'नवरदेव'

दिव्य मराठी वेब टीम | Apr 10, 2017, 11:24 AM IST

'जत्रा' या मराठी चित्रपटातील कोंबडी पळाली तंगडी धरुन या गाण्यातून लोकप्रिय झालेली क्रांती रेडकर बोहल्यावर चढलीये. हे ऐकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. क्रांतीच्या सर्व चाहत्यांना तिने नुकतेच फेसबुक पोस्टद्वारे धक्का दिला आहे. मीडियाला काही न कळवताच 29 मार्चला तिने लग्न केले. तिच्या लग्नाला फक्त तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातलग उपस्थित होते.
आता तिचा जोडीदार कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर क्रांती समीर वानखेडे या आयपीएस अधिकाऱ्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही क्रांतीने गाजावाजा न करता अगदी साधेपणाने लग्न करणे पसंत केले. पाहूया क्रांतीचे काही खास फोटोज...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा क्रांतीचे काही फोटोज...

Next Article

Recommended