आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशलने सांगितले \'दुःख\', शोमध्ये लोटपोट हसवणाऱ्या कलाकारांची अशी असते घरातील अवस्था !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'चला हवा येऊ द्या' हा केवळ एक शो नसून महाराष्ट्रातील लोकांच्या घराचा एक हिस्सा बनला आहे. शोप्रमाणेच त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. इतके नाव कमावणाऱ्या कलाकारांचा किती थाटमाट असेल असे आपणास वाटत असेल तर ते कसे चुकीचे आहे हे सांगणारे फोटो अभिनेता कुशल बद्रीकेने शेअर केले आहेत. लोकांच्या यावर फनी प्रतिक्रिया येत आहेत.
 
 फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुशल त्याच्या घरात भांडी घासताना दिसत आहेत तर भारत गणेशपुरे लादी पुसताना दिसत आहे. सागर कारंडे टेबलाखाली झाडू मारताना दिसत आहेत. हे सर्व काम करताना तिघांचेही चेहऱ्याचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. एकीकडे हे सर्व काम करत असताना श्रेया बुगडे मात्र खुर्चीवर बसून आरामात कॉफी पिताना दिसत आहे. 
 
 हे सर्व फोटो शेअर करताना कुशलने लिहीले आहे की, तुम्हाला हसवणार्या कलाकारांची घरी काय अवस्ता असते बघा...
                                                        अरे संसार संसार
                                                        झाडू, लादी, भांडी कर,
                                                         तुला दिली रे देवाने
                                                        एक बायको डोक्यावर...!!
                                                        चला जेवणाचं बघायला हवं काय ते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कुशलने शेअर केलेले इतर कलाकारांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...