आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ritesh Deshmukh\'s Lai Bhari Got Most Of The Awards In 1st Filmfare Marathi Awards

Filmfare Awardsमध्ये रितेश ठरला ‘लय भारी’, तर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सर्वोत्कृष्ठ चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“मला आजपर्यंत कधीही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. चित्रपटसृष्टीत आल्यावर मेहनत करताना हा पुरस्कार मिळावा, असं स्वप्न होतं. जेनेलियाला तिच्या तेलगु चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळालाय. पण मला एकदाही नाही. आता मरीठी फिल्मफेअर अवॉर्ड्स सुरू झाल्यावर तरी मला पुरस्कार मिळावा”, असे आपले मनोगत divyamarathi.comशी बोलताना रितेश देशमुखने व्यक्त केले होते. आणि शेवटी रितेशचे स्वप्न पूर्ण झाले.
फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स २०१४मध्ये रितेशने नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार जिंकलाच. एवढंच नाही, तर त्याचा ‘लय भारी’ चित्रपट बाकी चित्रपटांवर चांगलाच भारी पडल्याचंही दिसून आलं.
‘लय भारी’ सिनेमाला पाच, ‘फॅन्ड्री’ चित्रपटाला चार, ‘रेगे’ सिनेमाला चार, ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला चार, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटाला तीन, ‘रमा माधव’ सिनेमाला दोन, ‘अस्तू’ चित्रपटाला दोन, ‘एक हजाराची गोष्ट’ सिनेमाला एक, ‘पोस्टकार्ड’ चित्रपटाला एक, ‘टाइमपास’ सिनेमाला एक, ‘यलो’ सिनेमाला एक असे पुरस्कार मिळालेले आहेत.
अजिंक्यडिवाय फिल्मफेअर अवॉर्ड्स – २०१४ मध्ये पुरस्कार मिळालेल्यांची ही नावे-
जीवनगौरव पुरस्कार – रमेश देव
सर्वोत्कृष्ठ नवोदित दिग्दर्शक – अभिजीत पानसे – (रेगे)
- महेश लिमये – (यलो)
सर्वोत्कृष्ठ नवोदित अभिनेत्री – पर्ण पेठे – (रमा माधव)
सर्वोत्कृष्ठ नवोदित अभिनेता – रितेश देशमुख – (लय भारी)
सर्वोत्कृष्ठ पटकथा – परेश मोकाशी – (एलिझाबेथ एकादशी)
सर्वोत्कृष्ठ कथा – मधुगंधा कुलकर्णी – (एलिझाबेथ एकादशी)
सर्वोत्कृष्ठ सिनमॅटोग्राफर – विकास अम्लादी – (फॅन्ड्री)
सर्वोत्कृष्ठ संपादन – दिनेश गोपाल पुजारी – (रेगे)
सर्वोत्कृष्ठ ध्वनी संकलन – रोहित प्रधान - (रेगे)
सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीत – मॉन्टी शर्मा – (रेगे)
सर्वोतकृष्ठ कोरीओग्राफी – गणेश आचार्य (लय भारी)
सर्वोत्कृष्ठ निर्मिती सहाय्य – नितीन चंद्रकांत देसाई (रमा माधव)

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण ठरलं सर्वोतकृष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री