आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE : जखमी होऊनही भूषण प्रधानने पूर्ण केला फाइट सिक्वेन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता भूषण प्रधान)
अभिनेता भूषण प्रधानचा सिनेमा ‘टाइम बरा वाईट’ 19 जूनला प्रदर्शित होतोय आणि यात मुख्य भूमिकेत दिसणा-या भूषण ने पहिल्यांदाच हिरोसारखे फाइट सिक्वेन्स केलेत. विशेष म्हणजे हे फाइट सिक्वेन्स करणं त्याला चांगलच महागातही पडलंय.
सर्वसाधारणपणे अॅक्शन सिक्वेन्स करताना सुरक्षिततेसाठी हार्नेस वापरला जातो. मात्र चित्रपटात हार्नेस न वापरताच फाइट सिक्वेन्स केल्याचं समजत आहे. आणि याला दुजारा दिला खुद्द भूषण नेच. तो आपल्या दुखापती बाबत सांगतो, ”चित्रपटात एक पकडण्याचा सिक्वेन्स आहे. काही गुंड मला पकडत असतात. यात मी एका ड्रमवर उभा असतो आणि एक गुंड त्याला धक्का देतो. त्यामुळे मी ड्रमवरून उडी मारून पळून जातो. आमच्या प्रत्येक अॅक्शन सिक्वेन्सची रिहर्सल झालीय. अगदी आपण जशी डान्स सिक्वेन्सची करतो ना, तशीच. पण नेमकं आयत्यावेळी मी उडी मरताना हार्नेस नसल्याने जमिनीवर चांगलाच आपटलो. ढोपर फुटलं. मला लागल्याचं जाणवलंही. पण मग वाटलं की, अरे हे जर पुन्हा असंच शुट होऊ शकलं नाही तर?... सगळ्यांची मेहनत फुकट जाईल. म्हणून तो ‘चेस सिक्वेन्स’ तसाच चालू ठेवला. नंतर दिग्दर्शकाच्याच लक्षात आलं, की माझी डेनिम फाटलीय आणि रक्त येतंय. बाकी सगळे ‘वा! एका टेक मध्ये काय शॉर्ट मिळाला’ म्हणून खुश होते फक्त राहूललाच समजलं. तो धावत आला माझ्याकडे आणि मग प्रथमोपचार मिळाले.”
“खरं तर मला नेहमीच ‘स्विट लुकिंग गाय’ किंवा ‘चॉकलेट हिरो’ असा ठप्पा लागत आलाय आणि तशाच भूमिकाही मिळत आल्या आहेत. त्यामुळे खूप दिवसापासूनची इच्छा होती, की काही तरी वेगळं करायला मिळावं आणि अशाचवेळी राहूल भातणकर दिग्दर्शित या फिल्मची ऑफर मिळाली. ज्यात मला अॅक्शन सिक्वेन्सपासून डान्स पर्यंत सगळं करायला मिळणार म्हणल्यावर खूप एक्साइटेड होतो.”
या चित्रपटात भूषण सोबतच सतिश राजवाडे यांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या अॅक्शन सिक्वेन्स बाबत बोलताना सतिश राजवाडे सांगतात, “ हो भूषणला नुसतंच खरचटलं नाही त्याने तर आपली हाडंही यात मोडून घेतली आहेत. यात एक मोठा ‘चेस सिक्वेन्स’ आहे. ज्यात मी एक कोल्हापूरचा दादा आहे आणि भूषण ला मी आणि माझे गुंड पकडतो असा सिक्वेन्स आहे. ज्यात त्याच्यासोबत आम्हांलाही धावावं लागलंय. आणि हा सीन शूट करायला अजून एक दिवसही दिग्दर्शकाने जास्त घेतला असता तर आमच्या सगळ्यांसाठीच अँब्युलन्स बोलवावी लागली असती. एवढं आम्हा सगळ्यांना लागलंय.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'टाइम बरा वाईट'मधील खास छायाचित्रे...