आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता होते नाटकाचीही चोरी, \'श्रीमंत दामोदरपंत\' नाटक विनापरवानगी साकारताहेत नवखे कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवख्या कलाकारांनी तयार केलेले पोस्टर)
मुंबई : पुस्तकांची पायरसी होते, चित्रपटाचे कथानक जसेच्या तसे उचलले जाते अशा आजवर अनेक घटना घडल्या आहेत. पण आता चक्क मराठी नाटकांचीही चोरी व्हायला लागली आहे. ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे भरत जाधव एंटरटेनमेंट करत सध्या करत असलेले गाजलेले नाटक मुंबईतीलच एक नवख्या कलाकारांचा ग्रुप दिग्दर्शक, लेखक, मूळ निर्मिती संस्था यांच्या परवानगीविनाच सादर करतो आहे.
केदार शिंदे आणि लेखक ओमकार मंगेश दत्त यांनी फेसबुकवर या कलाकारांनी नाटकाचे हुबेहूब केलेले पोस्टर टाकून हे कलाकार कोण आहेत हे ठाऊक असल्यास माहिती पुरवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. हे कलाकार रंगकर्मी असल्याचे भान ठेवत केदार शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे मात्र सध्या टाळलेले आहे. ‘सहा वाजले गंमत पहा’ या गाजलेल्या टॅगलाइनपासून दामोदरपंतांच्या वेशभुषेपर्यंत हुबेहुब नक्कल दिसणारे पोस्टर नजरेस पडल्याने केदार शिंदे आणि ओमकार यांनी फेसबुकवर याविषयी वाचा फोडली आहे.
भरत जाधव एंटरटेनमेंटच्या निर्मितीखाली हे नाटक सध्या नव्याने गाजते आहे. त्यामुळे नवख्या कलाकारांना या नाटकाचा मोह झाला असल्याचे नवल नाही. पण अशा तऱ्हेने विनापरवानगी एखादे व्यावसायिक नाटक जसेच्या तसे उचलणे गैर असल्याने त्या कलाकारांना समज देऊन नाटक थांबवायला हवे असे केदार यांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिग्दर्शक केदार शिंदे आणि लेखक ओमकार मंगेश दत्त यांनी काय म्हटले फेसबुकवर...
बातम्या आणखी आहेत...