आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Track From Marathi Serial Honar Sun Me Hya Gharachi

Telly World : \'होणार सून मी ह्या घरची\'मध्ये मोठी आई आणि शरयूचा जान्हवीवरचा राग झाला दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(होणार सून मी ह्या घरची मालिकेतील पात्र - शरयू, जान्हवी आणि मोठी आई इंदू)
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत जान्हवीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे दिवस परतू लागले आहेत. श्रीचा जान्हवीवरचा राग आणि गैरसमज दूर झाला आणि ती पुन्हा त्याच्या आयुष्यात आली. मात्र गोखले कुटुंबात सर्व आयांशी पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा प्रयत्न जान्हवीला करावा लागतोय. त्यात ती ब-यापैकी यशस्वीसुद्धा झाली आहे. खरं तर गोखले कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाला जान्हवीच कारणीभूत आहे अशी समजूत बेबी आत्याने इतर आईंमध्येही निर्माण केली होती. त्यावरुन निर्माण झालेल्या वादाने श्रीने आपल्या सर्व आयांशी अबोला धरला होता, तो जान्हवीला मात्र रुचत नाहीये.
जान्हवीने आईआजीला सोबत घेऊन घरात निर्माण झालेल्या कलहावर मात करण्यासाठी उपाययोजना आखली आहे. त्यामध्ये जान्हवी यशस्वीसुद्धा झाली आहे. जान्हवीच्या प्रयत्नानंतर श्रीने आई आणि सरू मावशीसोबतचा अबोला तोडला. शिवाय आता मोठी आई आणि शरयूकाकू देखील जान्हवीकडे गाऱ्हाणं घेऊन आल्या. इंदूने स्वतःहून पुढाकार घेऊन श्रीशी येऊन बोलण्याचा प्रयत्न केला. जान्हवीने लढवलेल्या शक्कलमुळे श्री मोठ्या आईशी पुन्हा बोलू लागला.
आता शरयू श्रीशी बोलण्याचा प्रयत्न करतेय. मात्र शरयू आणि श्री यांच्यातील संवाद सुरळीत होतो का? श्री आपला राग विसरून सगळ्या आईंना माफ करतो का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
नोटः मंदार देवस्थळी दिग्दर्शित या मालिकेने नुकतचे यशस्वी 500 भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने मालिकेची संपूर्ण टीम 'चला हवा येऊ द्या' या शोच्या सेटवर आली होती. या शोमध्ये सर्व कलाकारांनी भरपूर धमालमस्ती केली. कलाकारांची ही धमाल तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...