आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: अरे देवा! रेवाच्या येण्याने रेश्माची उडालेली धांदल कमी होईना, सुरु आहे गोंधळात गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या आणि छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या शुक्रवारच्या अर्थातच 10 जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं, हे जाणून घ्या सविस्तर...
रेवा अचानक मुंबईत आल्याने रेश्माची चांगलीच धांदल उडालेली आहे. निशा आणि राकेश यांचे नाते तिच्यापासून लपवून ठेवताना अॅना, कैवल्य, सुजय, मीनल, आशू, रेश्मा या सगळ्यांचीच चांगली फजिती होताना दिसतेय. रेवाला आपल्या विखुरलेल्या संसाराबद्दल काहीही कळू न देण्यासाठी रेश्माची केवळ तारेवरची कसरत सुरु आहे. तिच्यापासून निशा आणि राकेशचे नाते लपवून ठेवण्यासाठी रेश्माने एक आयडिया शोधून काढली. तिने निशाला आशूची बायको असल्याचे रेवाला सांगितले. मग काय आशुने मोठ्या चतुराईने निशाला राकेशच्या घरातून हद्दपार केले आणि तो तिला आपल्या घरी घेऊन आला. तर दुसरीकडे राकेशने रेवाला बाहेर फिरायला घेऊन जायला नकार दिल्याने रेश्मा चांगलीच वैतागली. रेवाला निशाकडे म्हणजेच रूममेट्सच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय ती घेते आणि ती सुजयच्या घरी येते.
इकडे रेवापासून सत्य लपवून ठेवण्यासाठी आशू निशाकडे वारंवार आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसतो. तर दुसरीकडे कैवल्य मात्र आशूची फजिती करण्याच्या बेतात असतो. तो आशू आणि निशाचे प्रेमळ संवाद आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो आणि तो व्हिडिओ किंजलला अर्थातच आशूच्या गर्लफ्रेंडला पाठवतो.
किंजला आशूच्या घरी अवतरते आणि ब्रेकअप करण्याचा निर्णय घेते. किंजलची समजूत घालता घालता आशूला चांगलाच घाम फुटतो. आशूचे इतर रुममेट्स हसून भांडणाला दाद देताना दिसतात. किंजल तिथून निघून जाते. आशू पळत पळत तिच्या मागे जातो आणि तिला सत्य परिस्थिती सांगतो. रेवाला रेश्मा आणि राकेश यांच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा कळू नये, यासाठी आपण हे सर्व नाटक करत असल्याची कबुली तो किंजलजवळ देतो. किंजलचा आशूच्या बोलण्यावर विश्वास बसतो. आशू आणि किंजलमध्ये तर सर्व आलबेल होतं.
मात्र आता रेवा मुंबई असेपर्यंत सर्व रुममेट्सना हे नाटक सुरु ठेवावं लागणार आहे. हे नाटक करत असताना रेवाला आपल्या बहिणीच्या संसाराबद्दलचं सत्य कळेल का? रेश्मा या परिस्थितीला कशी सामोरे जाणार? हे 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या येणा-या एपिसोड्समध्ये बघणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या शुक्रवारच्या भागाची छोटीशी झलक...
बातम्या आणखी आहेत...