आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Track From Marathi Serial Honar Mi Sun Hya Gharchi

Telly World : बेबी आत्याला उमगली चूक, सर्वांसमोर मागणार श्री-जान्हवीची माफी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मराठी मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'होणार सून मी ह्या घरची'. सध्या या मालिकेत बेबी आत्याने आई आजींकडे स्वत:ची चूक मान्य केली आहे. 6 जुलै अर्थात सोमवारी या मालिकेचा 631वा भाग प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत... चला तर मग जाणून घ्या 'होणार सून मी ह्या घरची'चा लेटेस्ट ट्रॅक...
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत गोखले कुटुंबातील एक-एक सदस्यांचा जान्हवीवरील राग हळू-हळू दूर होत आहे. सुरुवातीला आई आजींनी जान्हवीला समजून घेतले, त्यानंतर श्री आणि आता घरातील प्रत्येक सदस्य जान्हवीला स्वीकारण्यास तयार होत आहे. मात्र बेबी आत्या कालपर्यंत तिच्या हट्टावर अडून बसली होती. गोखले कुटुंबावर आलेल्या संकटाला जान्हवी कारणीभूत असल्याचा गैरसमज बेबी आत्याने सर्व आईंमध्ये निर्माण केला होता. त्यावरून निर्माण झालेल्या वादांमुळे श्रीने सर्व आईंकडे पाठ फिरवली होती. मात्र आता जान्हवी गोखले कुटुंबाची एक सदस्य झाली असून, ती श्री आणि सर्व आईंमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मोठी आई, श्रीची आई आणि छोटी आई यांना जान्हवी प्रेग्नेंट असल्याची शंका येते. त्यांना गॉसिप सुरु होते. तिघीही जान्हवीला कशामुळे उलट्या झाल्यात यावर चर्चा करतात. दुसरीकडे,
जान्हवीची मैत्रीण गीता तिला सांगते, की तिच्या सासू तिच्यावर मुल होण्यासाठी जबरदस्ती करतेय. गीताला तिच्या सासूचे असे वागणे मूळीच आवडत नाही, त्यामुळे आमच्या घरात नेहमी भांडणे होतात, असे गीता जान्हवीला सांगते. दुसरीकडे गीताचा नवरा मनीष श्रीला सांगतो, की त्याला लग्न करून पश्चाताप झाला आहे. कारण घरातील सततच्या भांडणाला तो वैतागला आहे.
जान्हवी ब-याच दिवसांनी आपल्या माहेरी जाते. परंतु प्रेग्नेंसीमुळे तिला होत असलेल्या उलट्यांनी त्रस्त असते. तेवढ्यात जान्हवीची आई तिला विचारते घरात प्रेग्नेंसीविषयी सांगितले का?, यावर जान्हवी नकारार्थी मान हलवते. पिंट्याच्या लग्नाच्या आणि जान्हवीच्या बाबांच्या पायांच्या दुखण्यावर दोघींचे बोलणे. तेवढ्यात जान्हवीचे बाबा येतात आणि त्यांच्यात काही गप्पा होतात. आई शशिकला जान्हवीला बाबांना पायाची शस्त्रक्रिया करण्यास आणि त्यांची समजूत घालण्यास सांगते.
गोखले कुटुंबात, बेबी आत्या आई आजींकडे मला माझी चूक उमगली असे सांगून श्रीच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करते. त्यानंतर आई आजी बेबी आत्याची समजूत घालते. त्यानंतर बेबी आत्या मी श्रीसोबत बोलू का असा प्रश्न करते, तेवढ्यात आई आजी सांगतात, आधी जान्हवीसोबत बोल, नंतर श्रीसोबत.
आता बेबी आत्या जान्हवीसोबत काय बोलणार? श्री बेबी आत्याशी बोलणार का? आई शशिकला जान्हवीच्या बाबांना घर सोडण्यापासून थांबवेल का? पुढील भागात काय होणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, होणार सून मी ह्या घरची मालिकेच्या सोमवारीच्या एपिसोडची क्षणचित्रे...