आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: श्रीच्या आईला जान्हवीच्या वागण्याचं वाटतंय नवल, कधी कळणार सर्वांना गोड बातमी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवीच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. श्रीचा त्याच्या सर्व आयांवरचा राग दूर झाला असून गोखले कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काका आणि आई आजी यांच्याव्यतिरिक्त घरातील इतर मंडळींना जान्हवीच्या गोड बातमीविषयी कल्पना नाहीये. त्यातच जान्हवीच्या विचित्र वागण्याने श्रीची आई नर्मदा अचंबित झाली आहे. जान्हवीला नेमके काय झाले आहे, याच्याच विचारात ती आहेत. चला तर मग शुक्रवारच्या अर्थातच 10 जुलैच्या एपिसोडमध्ये नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात...
गोखले कुटुंबात गेल्या कित्येक दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. मात्र जान्हवीच्या प्रयत्नांनी कुटुंबात आनंद परतला आहे. नर्मदा, सरू, इंदू, शरयू, बेबी आत्या या सगळ्यांशी श्री पुन्हा मनमोकळेपणाने बोलू लागला आहे. मात्र जान्हवीच्या गोड बातमीविषयी अद्याप सर्व आयांना काहीच ठाऊक नाहीये. जान्हवीला बरं वाटतं नसल्याने श्रीने जान्हवीला ऑफिसला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ती श्रीचं म्हणणं ऐकते, मात्र घरी येताना आइस्क्रिम घेऊन ये, असेही त्याला सांगते. बरं नसल्याने जान्हवी घरी लवकर परतते. नर्मदा जान्हवीला डॉक्टरांनी काय सांगितले, असे विचारते. तेव्हा श्रीच तुम्हाला सांगेल, असे ती त्यांना सांगते आणि वेळ मारुन नेते. तितक्यात नर्मदा जान्हवीला सिलिंडर उचलण्यास मदत करण्यास सांगते, मात्र जान्हवी त्यांना नकार देते. पण तेवढ्यात काका तिथे येऊन सिलिंडर उचलतो आणि जान्हवीची या प्रसंगातून सुटका होते. ती झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून जाते. नर्मदा लक्ष्मीकांतला जान्हवीच्या चमत्कारिक वागण्याविषयी विचारणा करते, तेव्हा तिला काय झाले ते बघण्यासाठी लक्ष्मीकांत काका जान्हवीच्या खोलीत जातात. प्रेग्नेंट असल्याचे आयांना सांगू न शकत असल्याची खंत तिच्या मनात आहे. लक्ष्मीकांत काका जान्हवीची समजूत घालतात आणि तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देतात.
कधीही कुठल्याही कामाला नाही न म्हणणा-या जान्हवीने आपल्याला कामात मदत करण्यास नकार दिल्याने नर्मदा अंचबित होते. जान्हवी कधीही दुपारी झोपत नसल्याने सर्व जणींना आश्चर्याचा धक्का बसतो. तिला नेमके काय झाले, याच विचारात सर्वजणी असतात. तेवढ्यात श्री घरी परततो आणि मावशीला आइस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवण्यास सांगतो. सर्वजणी श्रीला डॉक्टरांनी काय सांगितले, असे विचारतात, तेव्हा आम्ही दोघे एकत्रच तुम्हाला सांगू असे म्हणून तो तेथून निघून जातो.
श्री-जान्हवी नेमकं काय सांगणार? हा एकच प्रश्न सर्व आयांना भेडसावतोय. आता श्री-जान्हवी सगळ्यांना गोड बातमी कधी सांगणार आणि ती कळल्यानंतर सर्व जणींची प्रतिक्रिया काय असणार? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘होणार सून मी ह्या घरची.’
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, शुक्रवारच्या एपिसोडची खास झलक...